End of Virat Kohli the captain in IPL history - २०११ ते २०२१ या कालावधीत विराट कोहलीनं ( Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाचे १४० सामन्यांत नेतृत्व केले आणि त्यापैकी ६६ सामने जिंकले, तर ७० मध्ये पराभव पत्करला. १३९ डावांमध्ये त्यानं ५ शतकं व ३५ अर्धशतकांसह ४१.९९च्या सरासरीनं ४८७१ धावा केल्या. सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) विरुद्धच्या पराभवानंतर विराटच्या डोळ्यांत पाणी दाटून आलेले सर्वांनी पाहिले आणि त्याचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल होताच चाहतेही भावनिक झाले.
शुबमन गिल ( २९) व वेंकटेश अय्यर ( २६) यांनी कोणताही धोका न पत्करता सावध खेळ करून पहिल्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या. पण, हर्षल पटेल व युझवेंद्र चहल यांनी KKRला धक्के देण्यास सुरुवात केले. नितीश राणा ( २३) चुकीचा फटका मारून बाद झाला. सुनील नरीननं मैदानावर येताच सलग तीन षटकार खेचून KKRवरील दडपण कमी केलं, परंतु मोक्याच्या वेळेला तोही बाद झाला. मोहम्मद सिराजनं १९व्या षटकात दिलेले दोन धक्के RCBला विजय मिळवून देणारे ठरतात, असे वाटू लागले. पण, इयॉन मॉर्गन व शाकिब अल हसन यांनी संयमी खेळ करताना KKRचा विजय पक्का केला. सिराज, हर्षल व युझवेंद्र यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.