IPL 2021, RCB vs PBKS Live Updates : पंजाबची गाडी रुळावरून घसरली, बंगलोरनं प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates : तिसऱ्या अम्पायरच्या वादग्रस्त निर्णयानं गाजलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं ( RCB) पंजाब किंग्सवर ( PBKS) विजय मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 07:29 PM2021-10-03T19:29:10+5:302021-10-03T19:30:43+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, RCB vs PBKS Live Updates : RCB qualified for the play-offs for the successive 2 years; beat Punjab by 6 runs  | IPL 2021, RCB vs PBKS Live Updates : पंजाबची गाडी रुळावरून घसरली, बंगलोरनं प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली

IPL 2021, RCB vs PBKS Live Updates : पंजाबची गाडी रुळावरून घसरली, बंगलोरनं प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates : तिसऱ्या अम्पायरच्या वादग्रस्त निर्णयानं गाजलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं ( RCB) पंजाब किंग्सवर ( PBKS) विजय मिळवला. देवदत्त पडिक्कल व ग्लेन मॅक्सवेल यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर RCBनं तगडं आव्हान उभं केलं. पंजाबला चांगली सुरुवात करूनही हार मानावी लागली. सलामीवीर माघारी परतताच अन्य फलंदाजही झटपट बाद झाले.  युझवेंद्र चहलनं पुन्हा एकदा मॅच विनिंग कामगिरी करताना सामना RCBच्या बाजूनं वळवला. या विजयासह RCBनं १६ गुणांसह सलग दुसऱ्या वर्षी प्ले ऑफमधील जागा पक्की केली. 

RCBचा कर्णधार विराट कोहली यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट व देवदत्त पडिक्कल यांनी RCBला चांगली सुरुवात करून देताना पॉवर प्लेत ५५ धावा कुटल्या. १०व्या षटकात मोईजेस हेन्रीक्सनं RCBचा सलग दोन धक्के दिले. २५ धावांवर खेळत असलेल्या विराटचा त्यानं त्रिफळा उडवला अन् डॅन ख्रिस्टीयनला पहिल्याच चेंडूवर पॉइंटवर उभ्या असलेल्या सर्फराज खानच्या हाती झेल देऊन माघारी परतला. 

हेन्रीक्सची हॅटट्रिक हुकली असली तरी पुढील षटकात त्यानं RCBची आणखी एक विकेट घेतली. पडिक्कल ४० धावांवर यष्टीरक्षक लोकेशच्या हाती झेल देऊन परतला.   ग्लेन मॅक्सवेलने सलग तिसरे अर्धशतक झळकावले. मोहम्मद शमीनं अखेरच्या षटकात मॅक्सवेलची विकेट घेतली. त्यानं ३३ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून ५७ धावा केल्या. ११.४ षटकांत RCBच्या ३ बाद ७३ धावा असताना मॅक्सवेल खेळपट्टीवर आला अन् संघाला मोठा पल्ला गाठून दिला. शमीनं अखेरच्या षटकात ३ विकेट्स घेतल्या आणि बंगलोरला ७ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारता आली.   

लोकेश राहुल व मयांक अग्रवाल यांनी पंजाबला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या १० षटकात ८२ धावा जोडल्या. ११व्या षटकात शाहबाज अहमदनं ही भागीदारी तोडली. लोकेश ३९ धावांवर माघारी परतला. मयांक-लोकेश या कर्नाटकच्या खेळाडूंनी बंगलोरच्या गोटात तणावाचं वातावरण निर्माण केलं होतं. या दोघांच्या खेळीवर निकोलस पूरननं पुन्हा पाणी फिरवलं. वारंवार संधी देऊनही पूरन अपयशी ठरताना दिसत आहे. याही सामन्यात तो ३ धावांवर बाद झाला. युझवेंद्र चहलनं आणखी एक धक्का देताना पंजाबचा सेट फलंदाज मयांकला ( ५७) माघारी पाठवले. आता खऱ्या अर्थानं पंजाब अडचणीत सापडायला सुरूवात झाली. त्याच षटकात सर्फराज अहमद भोपळ्यावर त्रिफळाचीत झाला. 

त्यापाठोपाठ एडन मार्करामही ( २०) बाद झाल्यामुळे पंजाबच्या अडचणी आणखी वाढल्या. चेंडू व धावांचे अंतर फारच वाढले होते आणि शाहरूख खान याच्याकडे तुफान फटकेबाजीशिवाय पर्याय नव्हता. पंजाबला अखेरच्या सहा चेंडूंत विजयासाठी १९ धावा हव्या होत्या. हर्षल पटेलनं पहिल्याच चेंडूवर शाहरूखला ( १६) धावबाद केले. हर्षलनं त्यानंतर चतुराईनं गोलंदाजी करताना RCBचा विजय पक्का केला. पंजाबला ६ बाद १५१ धावांवर समाधान मानावे लागले आणि बंगलोरनं ६ धावांनी हा सामना जिंकला. 
 

Web Title: IPL 2021, RCB vs PBKS Live Updates : RCB qualified for the play-offs for the successive 2 years; beat Punjab by 6 runs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.