IPL 2021, RCB vs PBKS, Live: कोहलीनं नाणेफेक जिंकली, फलंदाजी करणार; पंजाबच्या संघात तीन मोठे बदल, जाणून घ्या Playing XI

IPL 2021, RCB vs PBKS, Live Updates: आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात होतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 03:06 PM2021-10-03T15:06:01+5:302021-10-03T15:16:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 RCB vs PBKS Live updates Royal Challengers Bangalore wins toss selected bat first against punjab kings | IPL 2021, RCB vs PBKS, Live: कोहलीनं नाणेफेक जिंकली, फलंदाजी करणार; पंजाबच्या संघात तीन मोठे बदल, जाणून घ्या Playing XI

IPL 2021, RCB vs PBKS, Live: कोहलीनं नाणेफेक जिंकली, फलंदाजी करणार; पंजाबच्या संघात तीन मोठे बदल, जाणून घ्या Playing XI

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, RCB vs PBKS, Live Updates: आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात होतोय. रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आरसीबीच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्याच सामन्यातील संघ कायम ठेवत संघ आजच्या सामन्यात उतरत आहे. दुसरीकडे पंजाबनं संघात तीन मोठे बदल केले आहेत. पंजाबनं आजच्या सामन्यात सरफराज खान, हरप्रीत ब्रार आणि मोईसेस हेन्रिक्स यांना संधी दिली आहे.  


आयपीएलच्या यंदाच्या पर्वासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघ प्रत्येकी १८ गुणांसह प्ले-ऑफसाठी पात्र झाले आहेत. आता तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी इतर संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. यात बंगलोर आणि पंजाबच्या संघात मोठी चुरस पाहायला मिळू शकते. आजचा सामना जिंकून दोन्ही संघांना आपलं स्थान बळकट करता येणार आहे. 

बंगलोरला आजचा सामना जिंकून १६ गुणांपर्यंत मजल मारता येईल. तर पंबाजला सामना जिंकून स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवता येणार आहे. पंजाबनं आजचा सामना जिंकला तर त्यांना १२ गुणांसह चौथं स्थान प्राप्त करता येणार आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB):
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, केएस भरत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅनियल ख्रिश्चन, युजवेंद्र चहल, शाहबाज अहमद, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज 

पंजाब किंग्ज (PBKS):
केएल राहुल (कर्णधार), मयांक अग्रवाल, मार्करम, निकोलस पुरन, सरफराज खान, शाहरुख खान, मोईसेस हेन्रिक्स, हरप्रित ब्रार, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, अर्शदिप सिंग


 

Web Title: IPL 2021 RCB vs PBKS Live updates Royal Challengers Bangalore wins toss selected bat first against punjab kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.