Join us  

IPL 2021, RCB vs RR, Live: दुबेचा दबदबा, तर तेवतियाचा तडाखा; राजस्थान रॉयल्सचं 'कोहली ब्रिगेड'समोर १७८ धावांचं आव्हान

IPL 2021, RCB vs RR, Live: आयपीएलमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या राजस्थान रॉयल्स (rajasthan royals) संघानं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (royal challengers bangalore) समोर विजयासाठी १७८ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 9:31 PM

Open in App

IPL 2021, RCB vs RR, Live: आयपीएलमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या राजस्थान रॉयल्स (rajasthan royals) संघानं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (royal challengers bangalore) समोर विजयासाठी १७८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थान रॉयल्यकडून शिवम दुबेनं सर्वाधिक ४६ धावांची खेळी साकारली. तर राहुल तेवतियानं २३ चेंडूत ४० धावांची दमदार खेळी साकारली. राजस्थानच्या सलामीच्या फलंदाजांकडून यावेळी निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. जोस बटलर, मनन वोहरा, कर्णधार संजू सॅमसन आणि डेव्हिड मिलर स्वस्तात बाद झाले होते. त्यानंतर शिवम दुबे आणि रियान पराग यांनी संघाचा डाव सावरत दमदार भागिदारी रचली. (IPL 2021 RCB vs RR Live rajasthan royals sets 178 runs target against royal challengers bangalore)

आयपीएलचे फॅन आहात? मग सोप्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि जिंका आकर्षक बक्षिसे

शिवव दुबेनं ३२ चेंडूत ४६ धावा केल्या तर रियान परागनं १६ चेंडूत २५ धावांचं योगदान दिलं. दुबे आणि रियान यांनी अर्धशतकी भागिदारी रचल्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये राहुल तेवतियानं जोरदार फटकेबाजी करत २२ चेंडूत ४० धावांची दमदार खेळी साकारली. यात तेवतियानं दोन उत्तुंग षटकार आणि चार खणखणीत षटकार ठोकले. ख्रिस मॉरिसनं ७ चेंडूत १० धावा केल्या. अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मॉरिस बाद झाला.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या गोलंदाजांनी सामन्याची सुरुवात दमदार गोलंदाजीनं केली. मोहम्मद सिराजनं जोस बटलर याला जखडून ठेवलं होतं. सामन्याच्या तिसऱ्या षटकात सिराजनं जोस बटलर याला क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं. त्यानंतर मनन वोहरा ९ चेंडूत केवळ ७ धावा करुन माघारी परतला. डेव्हिड मिलरला तर मोहम्मद सिराजनं खातंही उघडू न देता माघारी धाडलं. त्यामुळे सामन्याच्या पाचव्या षटकातच राजस्थानची अवस्था ३ बाद १८ अशी झाली होती. कर्णधार संजू सॅमसन यानं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तोही सामन्याच्या आठव्या षटकात झेलबाद झाला. मॅक्सवेलनं सॅमसमचा झेल टिपला. राजस्थानची धावसंख्या ४ बाद ४३ अशी असताना रियान पराग आणि शिवम दुबे यांनी संघाला सावरलं. रॉयल चॅलेंजर्सकडून मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तर कायले जेमिन्सन, केन रिचर्डसन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.  

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहली