Join us  

IPL 2021, RCB vs RR, Live: कोहलीनं टॉस जिंकला, घेतला गोलंदाजीचा निर्णय; वानखेडेवर आज पुन्हा एकदा षटकारांचा पाऊस?

IPL 2021, RCB vs RR, Live: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (royal challengers bangalore) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (rajasthan royals) यांच्या लढतीचे अपडेट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 6:48 PM

Open in App

IPL 2021, RCB vs RR, Live: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (royal challengers bangalore) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (rajasthan royals) यांच्या लढत होतेय. विराट कोहलीनं सामन्याची नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. आरसीबीच्या संघात आज एक बदल करण्यात आला आहे. रजत पाटिदार याच्या जागी केन रिचर्डसन याला संधी देण्यात आली आहे. तर राजस्थान रॉयल्सच्या संघात श्रेयस गोपाल याचा समावेश करण्यात आला आहे.

वानखेडेवर बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघात झालेल्या सामन्यात चेन्नईनं तब्बल २२१ धावांचं आव्हान ठेवलं होतं. तर कोलकाता संघानंही प्रत्युत्तरात २०२ धावांपर्यंत मजल मारलेली पाहायला मिळाली. त्यामुळे या स्टेडियमवर धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघांनी यंदा वेगळ्या पद्धतीने सुरुवात केली. सलग तीन विजयामुळे आरसीबीचा आत्मविश्वास उंचावला. मुंबई, हैदराबाद आणि केकेआरला धूळ चारणारा विराटचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. रॉयल्सचे तीनपैकी केवळ एक विजय नोंदविला. चेन्नईकडून मागचा सामना हरताच हा संघ सहाव्या स्थानावर आला. त्यांना दुसऱ्या विजयाची प्रतीक्षा असेल. सांघिक कामगिरीचा अभाव ही रॉयल्सची कमकुवत बाजू आहे. संजूने शानदार शतकी धडाका करूनही त्यांना पंजाबविरुद्ध चार धावांनी पराभवाचा धक्का बसला होता. दिल्लीविरुद्धच्या विजयात द. आफ्रिकेचे डेव्हिड मिलर आणि ख्रिस मॉरिस यांचे योगदान राहिले. सीएसकेविरुद्ध जोस बटलरला अन्य सहकाऱ्यांची साथ मिळाली नव्हती. विजय मिळवायचा झाल्यास रॉयल्सला सांघिक कामगिरीचीच गरज असेल.

संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (royal challengers bangalore) विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, केन रिचर्डसन, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुदर, शाहबाज अहमद, कायले जेमिन्सन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, यजुवेंद्र चहल

राजस्थान रॉयल्स (rajasthan royals) संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, मनन वोहरा, शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाळ, चेतन साकरिया, मिस्तफिजूर रेहमान

 

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीसंजू सॅमसन