Join us  

IPL 2021, RCB vs SRH Live Updates : हर्षल पटेलनं इतिहास रचला, जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडला; सनरायझर्स हैदराबादचा डाव गडगडला

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Live Updates : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघानं सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये स्थान पक्के केले. आता उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवून टॉप टूमधील स्थान पक्कं करण्याचा RCBचा प्रयत्न असेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 9:13 PM

Open in App

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Live Updates : सलामीची जोडी बदलूनही सनरायझर्स हैदराबादचं ( SRH) नशीब काही बदललं नाही. जेसन रॉय व केन विलियम्सन वगळता SRHच्या अन्य फलंदाजांनी पुन्हा शरणागती पत्करली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या ( RCB) गोलंदाजांची कामगिरी सुरेख झाली. युझवेंद्र चहल विकेट घेऊन पुन्हा एकदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठी नावाचा विचार करा, असेच निवड समितीला ठणकावत आहे. हर्षल पटेलला रोखणं आता अवघडच आहे. त्यानं आजच्या सामन्यातही उल्लेखनीय कामगिरी करताना मोठा विक्रम केलाच, शिवाय हैदराबादला माफक धावांवर रोखले. 

त्यांच्यासमोर सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाचे आव्हान आहे. SRHचे आव्हान संपुष्टात आले असले तरी प्रतिष्ठेसाठी विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. उभय संघांमध्ये जय-पराजयाच्या आकडेवारीत हैदराबाद १०-८ असा आघाडीवर आहे. विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  

आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं सलामीच्या जोडीत प्रयोग केला. वृद्धीमान सहाएवजी SRHनं डावखुऱ्या अभिषेक शर्मा व जेसन रॉय ही जोडी उतरवली. अभिषेकला आज आपली छाप पाडण्याची संधी होती आणि त्यानं दुसऱ्याच षटकात जॉर्ज गार्टनला चौकार-षटकार टोलावला. मोहम्मद सिराजनं झेल सोडून त्याला जीवदानही दिलं, परंतु पुढच्याच चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात तो ( १३ धावा) बाद झाला. पण, त्यानंतर आलेला कर्णधार केन विलियम्सन याचे कव्हर ड्राईव्ह नेत्रदिपक होते. त्यानं जेसन रॉयसह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अतीआक्रमकपणा नव्हे तर केन लालित्यपूर्ण फटके मारून धावा बनवत होत. रॉयनं उत्तुंग फटके मारले, पण ते झेलण्यासाठी RCBचे खेळाडूच त्या जागी नव्हते. हर्षल पटेलनं १२व्या षटकात SRH ही सेट जोडी तोडली. केन ३१ धावांवर त्रिफळाचीत झाला अन् रॉयसोबतची त्याची ७० धावांची भागीदारी  संपुष्टात आली. प्रियाम गर्गला आज स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली, परंतु अवघ्या १५ धावा करून तो माघारी परतला. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डॅनिएल ख्रिस्टियननं स्वतःच्याच गोलंदाजीवर रॉयचा झेल टिपला. रॉय ४४ धावांवर माघारी परतला. पुढच्याच चेंडूवर युझवेंद्र चहलनं SRHच्या अब्दुल समदला ( १) पायचीत केले. SRHनं २६ धावांत ४ फलंदाज गमावले. हर्षल पटेलनं सातत्य कायम राखताना SRHला तीन धक्के दिले. हैदराबादला ७ बाद १४१ धावांपर्यंतच मजल मारता आली.  

हर्षल पटेलनं इतिहास रचला... आयपीएलच्या एकाच पर्वात सर्वाधिक २९ विकेट्स घेणारा हर्षल पटेल हा सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला. त्यानं जसप्रीत बुमराहनं मागील पर्वात नोंदवलेला २७ विकेट्सचा विक्रम मोडला. ( Most wickets by Indians in an IPL season). भुवनेश्वर कुमारनं ( SRH) २०१७मध्ये २६ , जयदेव उनाडकटनं २०१७ मध्ये ( RPS) २४ व हरभजन सिंग २०१३मध्ये ( MI) २४ विकेट्स घेतल्या होत्या.  

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबाद
Open in App