अबुधाबी - आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी फारशी लक्षवेधी झालेली नाही. मात्र सनरायझर्सचा युवा गोलंदाज उम्रान मलिक आपल्या द्रुतगती गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आयपीएल २०२१ ला सुरुवात होण्यापूर्वी त्याने केवळ एक लिस्ट ए आणि एक टी-२० सामना खेळला होता. दरम्यान बंगालविरुद्ध खेळलेल्या एका लिस्ट ए सामन्यात त्याच्या गोलंदाजीवर ९८ धावा फटकावल्या गेल्या होत्या. तर टी-२० सामन्यात मात्र त्याने ३ बळी टिपले होते. दरम्यान, काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याने लक्षवेधी कामगिरी केली. त्याने किफायतशीर गोलंदाजी करताना ४ षटकात २१ धावा देऊन एक बळी टिपला. (Umran Malik throws the ball at a speed of more than 150 kmph, Virat Kohli forgets the pain of defeat & give him a signed jersey)
बंगळुरूविरुद्धच्या सामन्यातील उम्रान मलिकच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने या सामन्यात एक चेंडू ताशी १५३ किमी वेगाने टाकला. आरसीबीच्या डावातील नवव्या षटकात उम्रान मलिक याने १५० किमीपेक्षा अधिक वेगाने सतत पाच चेंडू टाकले. उम्रान मलिकची ही गोलंदाजी हैदराबादच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली.
दरम्यान, उम्रानच्या गोलंदाजीचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनेही कौतुक केले. या सामन्यातील उम्रानची द्रुतगती गोलंदाजी पाहून विराट कोहली अवाक झाला होता. दरम्यान, सामना संपल्यानंतर हैदराबादकडून झालेल्या पराभवाची सल बाजूला ठेवत विराट कोहलीने उम्रानच्या गोलंदाजीचे कौतुक करताना त्याला ऑटोग्राफ असलेली जर्सी भेट दिली.
Web Title: IPL 2021, RCB vs SRH: Umran Malik throws the ball at a speed of more than 150 kmph, Virat Kohli forgets the pain of defeat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.