Indian Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी विराट कोहली व मोहम्मद सिराज हे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे ( RCB) प्रमुख खेळाडू लंडनहून दुबईत दाखल झाले. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात RCBनं ७ पैकी ५ सामने जिंकून १० गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे आणि आता प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी किमान ३ सामने जिंकावे लागतील. विराटचा फॉर्म हा संघासाठी चिंतेची बाब असला तरी देवदत्त पडीक्कल, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल हे भन्नाट फॉर्मात आहेत. त्यामुळे RCB चे प्ले ऑफमधील स्थान हे पक्क समजलं जात आहे. २० सप्टेंबरला कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच सामन्यात RCBच्या संघात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल. कर्णधार विराट कोहलीनं त्याबाबत घोषणा केली.
प्रत्येक पर्वात एका सामन्यात RCBचा संघ हिरव्या जर्सीत मैदानावर उतरतो. निसर्गाचे, पर्यावरणाचे रक्षण करण्याचा सामाजिक संदेश RCBया सामन्यातून देतो. पण, आता विराटचा संघ हिरव्या नाही तर निळ्या जर्सीत KKR विरुद्ध मैदानावर उतरलेला दिसेल. या निळ्या जर्सीतून RCBचा संघ कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सचा सन्मान करणार आहे आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा संदेशही ते देणार आहेत.
RCB Time Table 20 सप्टेंबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायं. 7.30 वाजल्यापासून24 सप्टेंबर - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून26 सप्टेंबर - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, सायं. 7.30 वाजल्यापासून 29 सप्टेंबर - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायं. 7.30 वाजल्यापासून3 ऑक्टोबर - पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून6 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून8 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून