IPL 2021 जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विराट कोहलीला बसला धक्का, अष्टपैलू खेळाडूची माघार!

Indian Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात दमदार कामगिरी करून जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक असलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू ( Royal Challengers Banglore) संघाला मोठा धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 10:21 AM2021-08-30T10:21:05+5:302021-08-30T10:21:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : RCB's Washington Sundar ruled out of remainder of the IPL due to a finger injury | IPL 2021 जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विराट कोहलीला बसला धक्का, अष्टपैलू खेळाडूची माघार!

IPL 2021 जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विराट कोहलीला बसला धक्का, अष्टपैलू खेळाडूची माघार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात दमदार कामगिरी करून जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक असलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू ( Royal Challengers Banglore) संघाला मोठा धक्का बसला. यूएईत होणाऱ्या या दुसऱ्या टप्प्यासाठी RCBनं वनिंदू हसरंगा, दुष्मंथा चमिरा आणि टीम डेव्हिड यांना करारबद्ध केले. त्यामुळे त्यांची ताकद वाढली होती, परंतु सोमवारी त्यांना धक्का देणारी बातमी समोर आली. संघातील अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (  Washington Sundar ruled out ) यानं उर्वरित आयपीएलमधून माघार घेतली आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या सुंदरच्या बोटाला दुखापत झाली होती आणि त्यानं दौऱ्यातून माघार घेतली होती. आता त्यानं आयपीएलमधूनही माघार घेतली आहे.

संयुक्त अऱब अमिराती येथे ( UAE) 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ३१ सामने खेळवण्यात येणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पा हा दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणार नाही. त्याच्या जागी RCBनं श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा याला करारबद्ध केले आहे. टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यावर वनिंदू हसरंगानं दमदार कामगिरी केली होती. याचसोबत दुसऱ्या टप्प्यात सायमन कॅटिचनं वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यामुळे माईक हेसन यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी असणार आहे. दुष्मंथा चमिरा व टीम डेव्हिड हे केन रिचर्डसन व फिन अॅलन यांना रिप्लेस करणार आहेत.

आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात RCBचा संघ १० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्याचे चाहते जेतेपदाची आस लावून बसले आहेत. RCBनं त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले की,''RCBचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर यानं आयपीएलच्या उर्वरित सामन्यांतून माघार घेतली आहे. त्याला रिप्लेसमेंट म्हणून बंगालचा क्रिकेटपटू व RCBचा नेट गोलंदाज आकाश दीप याचा समावेश करण्यात आला आहे. ( Akash Deep from Bengal will replace Washington Sundar in Royal Challengers Banglore for IPL 2021) 

गुणतालिका!
आयपीएल २०२१ मध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सनं 8 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नई सुपर किंग्स 7 पैकी 5 सामने जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू ( 10 गुण), मुंबई इंडियन्स ( 8), राजस्थान रॉयल्स ( 6), पंजाब किंग्स ( 6), कोलकाता नाइट रायडर्स ( 4) व सनरायझर्स हैदराबाद ( 2) हे गुणतालिकेत एकापाठोपाठ आहेत. 

Full Schedule
20 सप्टेंबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू, सायं. 7.30 वाजल्यापासून
24 सप्टेंबर - रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
29 सप्टेंबर - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू, सायं. 7.30 वाजल्यापासून
3 ऑक्टोबर - पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून
6 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून
8 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून

Web Title: IPL 2021 : RCB's Washington Sundar ruled out of remainder of the IPL due to a finger injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.