IPL 2021 Remaining Matches : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाचे उर्वरित सामने खेळवण्यासाठी बीसीसीआयनं सप्टेंबर-ऑक्टोबर विंडो निश्चित केली आहे. १८ किंवा १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत यूएईत ( UAE) खेळवण्याचा विचार सुरू आहे आणि २९ मे रोजी होणाऱ्या बैठकीत त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. २५०० कोटींचं नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआयनं UAEत सप्टेंबर-ऑक्टोबरची विंडो तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी या स्पर्धेत परदेशी खेळाडूंच्या सहभागाविषयी अजूनही चिंतेचं वातावरण आहेच. त्यात पंजाब किंग्सचा ख्रिस गेल ( Chris Gayle), चेन्नई सुपर किंग्सचा फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) आणि कोलकाता नाईट रायडर्सचा शाकिब अल हसन ( Shakib al Hasan) यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे CSK, PBKS व KKR यांचं टेंशन वाढलं आहे. क्रिकेटपटूंच्या वेगळ्या वाटा; भारताचा वर्ल्ड कप विजेता खेळाडू बनला पोलीस तर एकानं उडवलं विमान!
वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज ख्रिस गेल, बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकिब अन् दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ड्यू प्लेसिस यांनी आगामी कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( Caribbean Premier League ) खेळण्याचा निर्णय घेतला आहे. CPL 2021चे पर्व २८ ऑगस्ट व १९ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यामुळे हे तीन स्टार खेळाडू आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. गेल हा सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीओट्स संघात परतला आहे. त्यानं २०१७ व २०१८मध्ये या संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. पहिल्याच वर्षी गेलनं संघाला जेतेपद पटकावून दिले होते. गेलनं ४२४ ट्वेंटी-२० सामन्यांत २२ शतकं व ८६ अर्धशतकांसह १३,८९८ धावा केल्या आहेत. त्यानं १०७३ चौकार व १०१७ षटकार खेचले आहेत. IPL 2021 Remaining Matches : तारीख ठरवली पण, खेळायला खेळाडू कुठेत?; BCCIची डोकेदुखी वाढलीय!
शाकिब CPLच्या यंदाच्या पर्वात जमैका थलाव्हास संघाकडून खेळणार आहे. २०१६ व २०१७नंतर शाकिब पुन्हा थलाव्हास संघाकडून खेळताना दिसणार आहे. शाकिबनं ३२० ट्वेंटी-२० सामन्यांत ५११८ धावा केल्या आहेत. त्यात ४७६ चौकार व १२१ षटकारांचा समावेश आहे. त्यांनी ३६२ विकेट्सही घेतल्या आहेत आणि ६ धावांत ६ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. ड्यू प्लेसिस सेंट ल्युसिया झौक्स संघाकडून खेळेल. प्लेसिसचे CPLमधील हे दुसरे पर्व आहे. याआधी २०१६ मध्ये त्यानं सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीओट्स संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. ड्यू प्लेसिसनं २४७ सामन्यांत ६२५० धावा केल्या आहेत. त्यात एक शतक व ४१ अर्धशतकांचा समावेश आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ कोणते? BCCIची कमाई जाणून उडेल झोप!