IPL 2021 Remaining Matches : सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; पाकिस्तान ठरतंय त्यासाठी कारणीभूत!

IPL 2021 Remaining Matches : कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 2021चे उर्वरित सामने स्थगित करावे लागले. दुसऱ्या टप्प्यातील 31 सामन्यांसाठी बीसीसीआय सप्टेंबर किंवा नोव्हेंबर मध्यंतरानंतरच्या विंडोचा विचार करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 11:45 AM2021-05-12T11:45:09+5:302021-05-12T11:45:44+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Remaining Matches : After England, Kane Williamson’s New Zealand players unlikely for IPL 2021 Phase 2 | IPL 2021 Remaining Matches : सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; पाकिस्तान ठरतंय त्यासाठी कारणीभूत!

IPL 2021 Remaining Matches : सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; पाकिस्तान ठरतंय त्यासाठी कारणीभूत!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 Remaining Matches : कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 2021चे उर्वरित सामने स्थगित करावे लागले. दुसऱ्या टप्प्यातील 31 सामन्यांसाठी बीसीसीआय सप्टेंबर किंवा नोव्हेंबर मध्यंतरानंतरच्या विंडोचा विचार करत आहे. पण, हा दुसरा टप्पा खेळवणे बीसीसीआयसाठी एवढं सोपं नक्की नसेल. इंग्लंडचे खेळाडू आयपीएलच्या उर्वरित सामन्यांत खेळणार नसल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून स्पष्ट केले गेले. त्यात आता न्यूझीलंडच्या खेळाडूंचीही भर पडण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटका सनरायझर्स हैदराबाद व मुंबई इंडियन्सला बसण्याची शक्यता आहे. SRHनं नव्यानं नियुक्त केलेला केन विलियम्सन व MIचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट हे खेळाडू दुसऱ्या टप्प्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. सप्टेंबर महिन्यात किवी खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी यूएईत असणार आहेत. भारताच्या श्रीलंका दौऱ्याला कोरोनाची लागली नजर; प्रेक्षकांसाठी वाईट बातमी

भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तेथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल व त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर बीसीसीआय आयपीएल 2021चे उर्वरित सामने खेळवण्याच्या विचारात आहेत. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पूर्वीची विंडो आयपीएल 2021साठी योग्य असल्याचे मत बीसीसीआय व्यक्त करत आहे. परंतु याच कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दौरे नियोजित आहेत. न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी सप्टेंबर महिन्यात यूएईला येणआर आहे. आयपीएलसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हा दौरा रद्द करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे न्यूझीलंडचे प्रमुख खेळाडू आयपीएल 2021ला मुकण्याची शक्यता आहे. ( all top Kiwi cricketers will be unavailable for IPL 2021 Phase 2 if it is scheduled in September)

कोणते खेळाडू आयपीएल 2021ला मुकणार? - केन विलियम्सन ( SRH), अॅडम मिलने ( MI), ट्रेंट बोल्ट ( MI), मिचेल सँटनर ( CSK), लॉकी फर्ग्युसन ( KKR), टीम सेईफर्ट ( KKR), फिन अॅलन ( RCB), कायले जेमिन्सन ( RCB).

याच कालावधीत इंग्लडचा संघ तीन वन डे व तीन ट्वेटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर असणार आहे. तसेच बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे क्रिकेटपटूही आयपीएल 2021च्या दुसऱ्या टप्प्याला मुकण्याची शक्यता आहे. बांगलादेशचा संघ इंग्लंडविरुद्ध, तर अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानविरुद्धची मालिका खेळणार आहे.   वेस्ट इंडिजचा रोविंद्र रामनरीन कसा बनला भारताचा रॉबिन सिंग?; टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणारा पहिला परदेशी खेळाडू

इंग्लंडचे कोणते खेळाडू मुकणार - मोईन अली, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, इयॉन मॉर्गन, जोस बटलर, लायम प्लंकेट, सॅम कुरन, टॉम कुरन, ख्रिस वोक्स, जेसन रॉय, सॅम बिलिंग, डेव्हिड मलान, ख्रिस जॉर्डन, जॉनी बेअरस्टो
  

Web Title: IPL 2021 Remaining Matches : After England, Kane Williamson’s New Zealand players unlikely for IPL 2021 Phase 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.