IPL 2021 Remaining Matches : आयपीएलचे उर्वरित सामने लंडनमध्ये होणार; BCCI त्यासाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत बदल करणार!

IPL 2021 Remaining Matches : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं बीसीसीआयनं खेळाडूंसाठी तयार केलेलं बायो-बबल भेदला अन् एकामागून एक खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 03:16 PM2021-05-19T15:16:07+5:302021-05-19T15:16:56+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Remaining Matches : BCCI and ECB are in discussion to tweak the five-match Test series for IPL 2021 phase 2 | IPL 2021 Remaining Matches : आयपीएलचे उर्वरित सामने लंडनमध्ये होणार; BCCI त्यासाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत बदल करणार!

IPL 2021 Remaining Matches : आयपीएलचे उर्वरित सामने लंडनमध्ये होणार; BCCI त्यासाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत बदल करणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 Remaining Matches : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं बीसीसीआयनं खेळाडूंसाठी तयार केलेलं बायो-बबल भेदला अन् एकामागून एक खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागला. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगचे १४ वे पर्व ( IPL 2021) स्थगित करावे लागले. आता उर्वरित ३१ सामने कधी व कुठे खेळवायचे, यासाठी बीसीसीआयचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आयपीएल २०२१ स्थगित झाल्यानंतर भारतात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवरही अनिश्चिततेचं सावट आहे. त्यासाठी येत्या २९ मे रोजी बीसीसीआयनं महत्त्वाची बैठक बोलावली आहे. डिसेंबरमध्ये रंगणार कसोटी क्रिकेटमधील महासंग्राम; २६ वर्षांनंतर मोठ्या बदलासह दिग्गज खेळाडू मैदानावर उतरणार

वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आयसीसी व बीसीसीआयनं संयुक्त अरब अमिराती ( UAE) हा पर्याय समोर ठेवलाच आहे, परंतु हा त्यांचा प्लान B आहे. जुलै महिन्यात देशातील कोरोना परिस्थिती काय असेल त्यानंतर बीसीसीआय UAEत वर्ल्ड कप खेळवण्याचा विचार करतील. ''सध्याच्या घडीला वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारताकडेच आहे. बीसीसीआयही तसाच विचार करून चालत आहे. जर कोरोना परिस्थिती बिघडली, तर पुढचा विचार केला जाईल. हा निर्मण जून महिन्यानंतर घेतला जाईल. UAE हा दुसरा पर्याय आहेच,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. आईच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी इंग्लंड दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाली प्रिया पुनिया; आठवला सचिन तेंडुलकर, विराट कोहलीचा त्याग!

या बैठकीत इंडियन प्रीमिअर लीगच्या उर्वरित ३१ सामन्यांबाबतची चर्चा होणार आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तेथे ते सप्टेंबरपर्यंत कसोटी मालिका खेळणार आहेत आणि त्यामुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी लंडन या पर्यायाचा विचार सुरू आहे. इंग्लिश कौंटी क्लबनं आयपीएल आयोजनचा प्रस्ताव बीसीसीआयसमोर ठेवलाच आहे. त्याला इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाचाही पाठिंबा आहे आणि स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करणारे स्टार स्पोर्ट्स यांच्यासाठीही ते सोईचे आहे. Video : वीरेंद्र सेहवागनं सुरू केलीय 'माणुसकिची' बँक; गरजूंना देतोय मोफत ऑक्सिजन संच!
  
फ्रँचायझी होतील मालामाल
 

''लंडनमध्ये आयपीएल आयोजन स्वस्त पडेल. शिवाय लंडन सरकार क्रीडा स्पर्धांना प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देणार आहेत. त्यामुळे फ्रँचायझी मालकांना अधिक पैसा कमावता येईल. आतापर्यंत बीसीसीआयच्या डोक्यात हाच प्लान सुरू आहे,''असे सूत्रांनी TOI ला सांगितले.

भारत-इंग्लंड मालिकेत होणार बदल

भारताचे बहुतांश प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असणार आहेत आणि त्यामुळे तिथे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन करणं अधिक सोपं ठरेल. शिवाय अऩ्य देशांच्या खेळाडूंना लंडन गाठणं सोपं आहे. बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डांची चर्चा सुरू आहे. त्यासाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत बदल करता येईल, का असाही विचार सुरू आहे. 

 

Web Title: IPL 2021 Remaining Matches : BCCI and ECB are in discussion to tweak the five-match Test series for IPL 2021 phase 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.