इंडियन प्रीमिअर लीगच्या १४ व्या पर्वाचे ( IPL 2021 Remaining Matches ) उर्वरित ३१ सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE येथे पार पडणार असल्याचे बीसीसीआयनं जाहीर केले आहे. त्यामुळे आता सर्व फ्रँचायझी खेळाडूंची राहण्याची सोय करण्यासाठी तेथील हॉटेल्स व वाहतुक व्यावसायिकांशी चर्चा करत आहे. आयपीएलच्या उर्वरित सामन्यात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, अफगाणिस्तान आदी देशांचे खेळाडू खेळण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआयनं जाहीर केलेल्या तारखांच्या वेळी या देशांच्या आंतरराष्ट्रीय मालिका होणार आहेत. त्यामुळे पदरेशी खेळाडूंच्या सहभागावर प्रश्नचिन्ह आहेच. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals ) गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यामुळे DC रिषभ पंतकडून ( Rishabh Pant) नेतृत्वाची जबाबदारी काढून घेतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
IPL New franchises for 2022 : अदानी ग्रुप आयपीएलमधील नवा संघ खरेदी करणार; अहमदाबादसाठी बोली लावणार!
Delhi Capitals चा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हा पूर्णपणे फिट झाला असून आयपीएलच्या उर्वरित सामन्यात खेळणार असल्याचे त्यानं सोमवारी जाहीर केले. ( Shreyas Iyer on Monday said he would be available for the Delhi Capitals when the IPL 2021 season resumes in the UAE). अय्यरचे तंदुरुस्त होणे ही दिल्ली कॅपिटल्ससाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. पण, त्यामुळे रिषभ पंतकडून कर्णधारपद काढून घेतले जाईल का? असा प्रश्न पडला आहे.
आयपीएलपूर्वी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली होती आणि त्यानं आयपीएलमधून माघार घेतली होती. त्याच्या गैरहजेरीत दिल्ली कॅपिटल्सनं कर्णधारपदाची जबाबदारी रिषभकडे सोपवली होती. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीनं ८ पैकी ६ सामने जिंकून गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.
तो पुढे म्हणाला,''माझा खांदा आता बरा झाला आहे. आता मी तंदुरूस्तीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्याला एक महिना जाईल आणि त्यामुळे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात मी खेळेन.''