Join us  

IPL 2021 Remaining Matches : WTC Finalमध्ये टीम इंडियाची धुलाई करणाऱ्या किवी फलंदाजाला डिमांड; आयपीएल फ्रँचायझींमध्ये चढाओढ!

IPL 2021 Remaining Matches : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाचे उर्वरित ३१ सामने संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAEत खेळवण्यात येणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 4:37 PM

Open in App

IPL 2021 Remaining Matches : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाचे उर्वरित ३१ सामने संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAEत खेळवण्यात येणार आहेत. १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडेल, असे बीसीसीआयनं आधीच जाहीर केलं आहे. पण, या स्पर्धेत परदेशी खेळाडूंच्या सहभागाविषयी साशंकता आहे. इंग्लंडचे खेळाडू या स्पर्धेत खेळणार नसल्याचे आधीच जाहीर करण्यात आले आहे. त्यात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका या देशांच्या राष्ट्रीय मालिका असल्यानं त्यांनाही काही सामन्यांना मुकावे लागणार. अशात न्यूझीलंडने मात्र त्यांचे खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध असतील असे जाहीर केले आहे. त्यामुळे  परदेशी खेळाडूंची रिप्लेसमेंट म्हणून सर्व फ्रँचायझी आतापासून कामाला लागल्या आहेत. 

 Big News : भारतात रंगणार नाही ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा थरार, जय शाह यांची मोठी घोषणा

न्यूझीलंड संघाचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेय ( Devon Conway in huge demand in IPL) याच्यासाठी आयपीएल फ्रँचायझींमध्ये चढाओढ रंगताना दिसत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कॉनवेयनं भारतीय गोलंदाजांची परीक्षा घेतली. शिवाय त्याआधी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या     कसोटी मालिकेत त्यानं द्विशतकी खेळीसह सर्वाधिक धावा चोपल्या. वन डे व ट्वेंटी-२० क्रिकेटमधील त्याची कामगिरीही दमदार झाली आहे. त्यामुळे आता आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यात रिप्लेसमेंट म्हणून कॉनवेयची डिमांड वाढली आहे.

डेव्हॉन कॉनवेयची कामगिरी

  • कसोटी - ३ सामने, ३७९ धावा, २०० सर्वोत्तम खेळी, ६३.१६ सरासरी, १००/५० - १/२
  • ट्वेंटी-२० - १४ सामने, ४७३ धावा, ९९* सर्वोत्तम खेळी, ५९.१२ सरासरी
  • वन डे - ३ सामने, २२५ धावा, १२६ सर्वोत्तम खेळी, ७५ सरासरी, १००/५० - १/१ 

 

ना ICC ट्रॉफी, ना IPL जेतेपद; विराट कोहलीनं किवी कर्णधार केन विलियम्सनकडून शिकावं, पाकिस्तानी खेळाडूचा सल्ला

सनरायझर्स हैदराबाद - जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत सनरायझर्स हैदराबाद संघाला सलामीसाठी सक्षम पर्याय मिळणे अवघड आहे. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ डेव्हॉन कॉनवेयचा विचार करत आहे.

कोलकाता नाईट रायडर्स - शुबमन गिलचे अपयश अन् इयॉन मॉर्गनची अनुपस्थिती यामुळे कोलकाता नाईट रायडर्सही कॉनवेयचा विचार करत आहेत. 

राजस्थान रॉयल्स - जोस बटलर, लायम लिव्हिंगस्टोन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर या प्रमुख खेळाडूंसिवाय राजस्थान रॉयल्सला आयपीएलच्या उर्वरित लढतीत उतरावे लागेल. अशात कॉनवेयच्या समावेशानं त्यांना थोडासा आधार मिळू शकतो. 

टॅग्स :आयपीएल २०२१सनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्स