IPL 2021 Remaining Matches : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या उर्वरित सामन्यांचा आज फैसला होणार आहे. बीसीसीआयनं त्यासाठी आज महतत्त्वाची बैठक बोलावली आहे. पण, फक्त आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन हेच बीसीसीआयसमोरील आव्हान नाही, तर खेळाडूंची उपलब्धतेबाबतही त्यांना विचार करावा लागणार आहे. हिच चिंता फ्रँचायझींनाही सतावत आहे. त्यामुळेच आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक संघांमध्ये नेतृत्व बदल झालेले पाहायला मिळणार. कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये नेतृत्वबदल झालेले पाहायला मिळतील. Photo : महेंद्रसिंग धोनी होणार पुणेकर; पिंपरी-चिंचवड येथे घेतलंय लै भारी घर!
इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापकिय संचालक अॅश्ली जाईल्स यांनी आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात इंग्लंडच्या खेळाडूंना खेळण्यास परवानगी दिली जाणार नाही, हे आधीच स्पष्ट केले. त्याशिवाय न्यूझीलंड, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या उपलब्धतेबाबतही साशंकता आहे. इंग्लंडचे खेळाडू खेळणार नसल्यानं कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) संघाला कर्णधार इयॉन मॉर्गनच्या सेवेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात KKRचे नेतृत्व दिनेश कार्तिक याच्या खांद्यावर सोपवले जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. ( Dinesh Karthik KKR Captain? ) निवृत्तीनंतरही हाशिम आमलाची बॅट तळपतेय, कौंटी क्रिकेटमध्ये चोपल्या ५७७ धावा, Video
गौतम गंभीरनंतर कार्तिकनं KKRचे नेतृत्व सांभाळले होते, परंतु त्याला अपयश आलं. त्यानंतर २०२०च्या पर्वात मध्यांतरानंतर मॉर्गनकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. मॉर्गनलाही अपयश आलेलं पाहायला मिळालं. आता पुन्हा कार्तिककडे नेतृत्व जाण्याची चर्चा आहे. कार्तिकनं ३७ सामन्यांत २१ विजय मिळवले आहे. या पर्वात कोलकातानं मॉर्गनच्या नेतृत्वाखाली ७पैकी दोनच सामने जिंकले आहेत. तसेच SRHनं या पर्वात डेव्हिड वॉर्नरकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेताना विलियम्सनला कर्णधार बनवले. पण, एकच सामन्यानंतर स्पर्धाच स्थगित झाली. विलियम्सन दुसऱ्या टप्प्यात खेळण्याची शक्यता कमी आहे आणि त्यामुळे SRHचे नेतृत्व पुन्हा भुवनेश्वर कुमारकडे जाण्याची शक्यता आहे.
CPL 2021चे पर्व २८ ऑगस्ट व १९ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यामुळे विंडीज खेळाडूंना सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागेल.
- इंग्लंड - बांगलादेश दौरा ( ३ वन डे व ३ ट्वेंटी-२०), पाकिस्तानविरुद्धची दोन सामन्याची मालिका
- कोणते खेळाडू मुकणार - मोईन अली, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, इयॉन मॉर्गन, जोस बटलर, लायम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, टॉम कुरन, ख्रिस वोक्स, जेसन रॉय, सॅम बिलिंग, डेविड मलान, ख्रिस जॉर्डन, जॉनी बेअरस्टो.
- न्यूझीलंड - न्यूझीलंड यूएईत पाकिस्तानविरुद्ध ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार
- कोणते खेळाडू मुकणार - केन विलियम्सन, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, टीम सेईफर्ट, फिन अॅलन, कायले जेमिन्सन
- ऑस्ट्रेलिया - श्रीलंकेविरुद्ध ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेचे आयोजन
- कोणते खेळाडू मुकणार - ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, झाय रिचर्डसन, मार्कस स्टॉयनिस, स्टीव स्मिथ, रिले मेरेडीथ, नॅथन कोल्टर नील. केन रिचर्डसन, डॅनिएल सॅम्स, डॅन ख्रिस्टियन, ख्रिस लीन, अँड्य्रू टाय, बेन कटींग, जेसन बेहरेनडॉर्फ, मोईसेस हेन्रीक्स, अॅडन झम्पा.
- दक्षिण आफ्रिका - नेदरलँड्स यांच्याविरुद्धची मालिका, त्यानंतर काही खेळाडू CPL 2021त खेळणार
- कोणते खेळाडू मुकणार - क्विंटन डी कॉक, फॅफ ड्यू प्लेसि, कागिसो रबाडा, इम्रान ताहीर, अॅनरिच नॉर्ट्जे, ख्रिस मॉरिस, डेव्हिल मिलर, लुंगी एनगिडी, मार्को जॅन्सेन
- बांगलादेश - शाकिब अल हसन, मुस्ताफिजुर रहमाना
- वेस्ट इंडिज - किरॉन पोलार्ड, ख्रिस गेल, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शिमरोन हेटमायर, सुनील नरीन, फॅबियन अॅलेन, ड्वेन ब्राव्हो, जेसन होल्डर
Web Title: IPL 2021 Remaining Matches : Eoin Morgan and Kane Williamson set to miss remaining matches, who will lead KKR and SRH in Phase 2?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.