IPL 2021 Remaining matches : आयपीएल 2021च्या उर्वरित सामने खेळवण्यासाठी बीसीसीआय सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. बीसीसीआयनं 31 सामन्यांच्या आयोजनासाठी संयुक्त अरब अमिरातीची निवड केली आणि तशी अधिकृत घोषणाही केली आहे. सोमवारी बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत आयपीएलचे सामने खेळवण्यात येतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येईल. पण, आता आयसीसीने बीसीसीआयला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. InsideSport.co ने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयला 10 ऑक्टोबरपर्यंतचीच मुदत आयसीसीकडून मिळणार आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या अडचणी वाढणार आहेत. ( any extension beyond October 10th will not go down well with the ICC)
आयपीएल 2021चे उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर या विंडोत यूएईत होतील अशी घोषणा बीसीसीआयनं मागील महिन्यात केली होती. 29 मे रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आणि त्याचवेळी बीसीसीआयनं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनसाठी आयसीसीकडे जून अखेरपर्यंत वेळ मागितला आहे. आयपीएल पूर्ण करण्यासाठी बीसीसीआय सर्व प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आयसीसीच्या अधिकाऱ्यांशी यूएईत जाऊन भेट घेतली आहे. मागील 10 दिवसांत बीसीसीआयनं अनेक क्रिकेट मंडळांशीही चर्चा केली आहे, परंतु InsideSport.coनं दिलेल्या वृत्तानुसार 10 ऑक्टोबरनंतर एकही दिवस वाढवून देण्यास आयसीसीचा नकार आहे. IPL 2021ला वाचवण्यासाठी BCCI नं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा दिलाय बळी?; एका निर्णयानं वाढवली आयसीसीची डोकेदुखी
“ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 18 ऑक्टोबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे आणि अशात 15 ऑक्टोबरपर्यंत आयपीएल कशी खेळवली जाऊ शकते?, आयसीसी त्याला परवानगी देणे शक्य नाही. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना संघ 15 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या आयपीएलमध्ये खेळण्यास कसे काय परवानगी देतील? त्यामुळे बीसीसीआयला 10 ऑक्टोबरपलिकडे वेळ देण्याची शक्यता कमी आहे,” असे सूत्रांनी सांगितले. India tour of England : भारतीय संघासाठी आनंदवार्ता; WTC final नंतर 20 दिवसांची सुट्टी अन् कुटुंबीयांसोबत भटकंती
जूलै 2020 मध्ये आयसीसीनं जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार ऑक्टोबरच्या मध्यंतरापासून ते 14 नोव्हेंबरपर्यंत ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळवण्यात येईल, असे म्हटले गेले होते. पण, आयसीसीनं अद्यापही संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलेलं नाही.
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी श्रीलंकेचा पर्याय
ANI नं दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनासाठी श्रीलंकेकडे विचारणा करत आहे. आयसीसीच्या नियमानुसार मोठ्या स्पर्धेच्या आयोजनापूर्वी तेथील स्टेडियम 15 दिवस आधी ताब्यात देणे आवश्यक आहे. अशात आयपीएल यूएईत झाल्यास ते शक्य होणार नाही. त्यामुळेच बीसीसीआय हा दुसरा पर्याय शोधत आहे.
Web Title: IPL 2021 Remaining matches : ICC ‘unlikely to allow’ BCCI to extend IPL 2021 window till October 15th
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.