IPL 2021, Rishabh Pant: दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत यानं गेल्या काही वर्षात भारतीय क्रिकेट संघात उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. तर आयपीएलमध्येही संघाचा कर्णधार म्हणून त्याची कामगिरी नक्कीच वाखाणण्याजोगी राहिली आहे. पंतच्या भविष्याबाबत दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पाँटिंग यानं मोठं विधान केलं आहे.
लय भारी... १ हजारी मुंबईचा 'कारभारी'! रोहित शर्माचा KKR विरुद्ध अनोखा विक्रम
ऋषभ पंतला भारतीय संघातून बाहेर काढण्यासाठी एका तगड्या खेळाडूची गरज आहे. त्याला सहजासहजी संघातून कुणी बाहेर काढू शकत नाही, असं रिकी पाँटिंग म्हणाला. दमदार कामगिरीच्या जोरावर ऋषभ पंत भारतीय संघासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती राहिला आहे. ऋषभ पंत भविष्यात बराच काळ भारतीय संघाचा सदस्य राहणार आहे. त्याची जागा इतक्यात कुणीच घेऊ शकत नाही, असं पाँटिंग म्हणाला. गेल्या दोन वर्षात पंतच्या फलंदाजीत परिपक्वता आल्याचंही तो म्हणाला.
'IPL मध्ये मिळणारा पैसा पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरोधात आक्रमक खेळत नाहीत'
"ऋषभ पंतच्या खेळीत सुधारणा होताना मी अतिशय जवळून पाहतो आहे. तो किती परिपक्व होत जातोय तेही मी पाहातोय. भारताच्या टी-२०, वनडे आणि कसोटी अशा तिन्ही संघात त्यानं स्वत: स्थान निर्माण केलंय. या तिन्ही संघातून त्याला बाहेर काढण्यासाठी एका तगड्या खेळाडूची गरज भासेल. तुम्ही पंतला सहजासहजी आता संघाबाहेर करू शकत नाही", असं रिकी पाँटिंग म्हणाला.
ऋषभ पंतनं नुकतंच हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात कर्णधारी खेळी साकारण्याचा उत्तम प्रयत्न केला आणि २१ चेंडूत ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. दिल्लीच्या संघानं हैदराबादला ८ विकेट्सनं पराभूत केलं. क्षेत्ररक्षणावेळी पंत अतिशय शांत आणि तितकाच सक्रिय दिसून आला. यूएईमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यात देखील दिल्लीनं आपली कामगिरी उंचावली आहे.