सुनील गावसकर
स्ट्रेट ड्राईव्ह
दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील हा सामना संभाव्य क्वालिफायर सामन्याची तयारी होऊ शकतो. हे दोन्ही संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानावर आहेत. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम होणार नाही. मात्र, प्ले ऑफकडे पाहिले तर मानसिक आघाडी मिळवण्याच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा ठरेल. गतविजेत्या मुंबईला पराभूत केल्यानंतर दिल्लीचा संघ या लढतीत चांगल्या मानसिकतेने उतरेल, तर चेन्नईच्या संघाला राजस्थाने पराभूत केले. यावेळी संघात ब्रावो आणि दीपक चहर नव्हते. मात्र, १९० चे लक्ष्य गाठताना राजस्थानच्या संघाने कमालीचे प्रदर्शन केले. चेन्नईचा संघ पुढे जाण्याच्या दृष्टीने असेल आणि महत्त्वाच्या खेळाडूंना प्ले ऑफच्या आधी आराम देण्याचा प्रयत्न करत आहे.
ऋतुराज गायकवाड याची खेळी जबरदस्त होती. त्यात ताकद, तंत्र आणि क्लास होता. त्या सर्वांमध्ये या युवा खेळाडूने लय न गमावता डावाला सावरले आणि वेगाने पुढे नेले. ज़डेजा शानदार फॉर्ममध्ये होता.
त्याने मुस्तफिजूरच्या चेंडूवर ऑफसाईडला जाताना स्वीप लगावत षट्कार मारला. तो असाधारण होता. प्रशंसकांना त्यानंतर गायकवाडच्या षट्काराने मोहित केले. त्याने त्याच षट्काराने शतकही पूर्ण केले. हा या स्पर्धेतील सर्वांत लांब षट्कार ठरला आणि यापुढे जाण्यासाठी कुणालाही एक खास फटका मारावा लागेल.
मुंबईच्या विरोधात दिल्लीने अचूक गोलंदाजी केली. नॉर्खिया, रबाडा आणि युवा आवेश खान यांनी आपल्या गोलंदाजीने मुंबईच्या फलंदाजांना संघर्ष करण्यास भाग पाडले. रोहित जो चांगला पुल शॉट खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याला देखील हा शॉट खेळण्यास उशीर झाला. त्यावरूनच लक्षात येते की, आवेश खान किती वेगाने गोलंदाजी करत होता. अखेरच्या षटकामध्ये त्याने यॉर्कर टाकत हार्दिक पांड्याला बाद केले. मुंबईला बुमराहच्या लयीत नसण्याचा फटका बसला. त्यामुळे या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. स्पर्धेच्या या फेरीत पांड्या बंधू अपयशी ठरले आहेत. सूर्यकुमार यादवदेखील अपयशी ठरला. आणि जर चमत्कार झाला नाही तर मुंबईचा संघ स्पर्धेबाहेर फेकला जाईल.
Web Title: IPL 2021: Rituraj Gaikwad shows 'Class'; Tremendous play in every match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.