IPL 2021, Roit Sharma: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं आज आयपीएलच्या इतिहासात अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलमध्ये एखाद्या संघाविरोधात वैयक्तिक तब्बल १ हजार धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मानं कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध खेळताना आतापर्यंत १ हजारांहून अधिक धावांची नोंद केली आहे.
अफगाणिस्तान नेमकं कोणत्या राष्ट्रध्वजासह टी-२० वर्ल्डकप खेळणार? तालिबाननं जाहीर केली भूमिका
रोहित शर्मा आजच्या सामन्यात केकेआर विरुद्ध आपल्या नेहमीच्याच जबरदस्त फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. रोहित आणि क्विंटन डिकॉक जोडी पहिल्या पावरप्लेनंतरही नाबाद असून मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात प्राप्त झाली आहे.
'IPL मध्ये मिळणारा पैसा पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरोधात आक्रमक खेळत नाहीत'
रोहित शर्मानं कोलकाताविरोधात आजवर खोऱ्यानं धावा केल्या आहेत. यात ५ अर्धशतकं आणि एका खणखणीत शतकाचा देखील समावेश आहे. आयपीएलच्या यंदाच्या सीझनच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात रोहित शर्माला किरकोळ दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली होती. या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जनं मुंबईचा पराभव केला होता. पण आजचा सामना मुंबई इंडियन्ससाठी अतिशय महत्त्वाचा आहे. गुणतालिकेत सध्या चौथ्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सला आजचा सामना जिंकून गुणतालिकेत तिसरं स्थान गाठता येणार आहे. पण पराभवाला सामोरं जावं लागल्यास पाचव्या स्थानावर घसरण होईल. त्यामुळे आज रोहित शर्माच्याच नेतृत्त्वात मुंबईचा संघ उतरला आहे.
त्याच्या नंतर सनरायजर्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने केकेआर विरोधात आतापर्यंत ९१५ धावा फटकावल्या. डेव्हिड वॉर्नर यानेच पंजाब किंग्ज विरोधात ९४३ धावा केल्या आहेत. तर विराटने दिल्ली कॅपिटल्सविरोधात ९०९ धावा केल्या आहेत. एक हजार धावा पूर्ण करणारा रोहित हा पहिला फलंदाज ठरला. रोहितने या सामन्यात ३० चेंडूत चार चौकारांसह ३३ धावा केल्या. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत २०८ सामन्यांत ५५१३ धावा केल्या आहेत.
रोहित शेर, तो नरेन सव्वाशेररोहित याने केकेआरविरोधात १ हजार धावांचा टप्पा गाठला खरा; पण नरेन याने लाँग ऑनला सीमारेषेच्या काही अंतर पुढे त्याला शुभमन गीलकरवी झेल बाद केले. नरेन याने आयपीएलमध्ये सात वेळा रोहित शर्माला बाद केले आहे. याबाबतीत त्याने भारताचा जलदगती गोलंदाज जहीर खान आणि संदीप शर्मा यांची बरोबरी केली आहे. जहीर याने सात वेळा धोनीला बाद केले आहे. तर संदीप याने आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याला सात वेळा तंबूत पाठवले आहे. या दोन्ही गोलंदाजांच्या कामगिरीची बरोबरी नरेन याने आज केली.