Join us

VIDEO: रोहित शर्मा बनला प्रँकस्टार, पत्नी रितीकासोबत केलेला प्रँक एकदा पाहा...

IPL 2021, Mumbai Indians: रोहित शर्मा प्रँक करण्यातही खूप हुशार आहे. त्यानं पत्नी रितिकासोबत एक प्रँक करतानाचा व्हिडिओ शूट केला आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 10:46 IST

Open in App

IPL 2021, Mumbai Indians: आयपीएलमध्ये यंदाच्या पर्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी काहीशी निराशाजनक झालेली पाहायला मिळत आहे. प्ले-ऑफमध्ये दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुरपकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं आपली जागा पक्की केली आहे. तर चौथ्या स्थानासाठी कोलकाता, राजस्थान, पंजाब आणि मुंबई इंडियन्समध्ये चुरस आहे. मुंबई इंडियन्सकडून लौकिकाला साजेशी कामगिरी होत नसल्यामुळं अर्थात संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मावरही दबाव आहे. सामन्यापूर्वीचा हाच ताण हलका करण्यासाठी रोहित आपल्या पत्नी आणि मुलीसोबत वेळ व्यतीत करत आहे. 

रोहित शर्मा प्रँक करण्यातही खूप हुशार आहे. त्यानं पत्नी रितिकासोबत एक प्रँक करतानाचा व्हिडिओ शूट केला आहे आणि तो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत रोहित शर्मा एक चॉकलेट त्याच्या मुठीत बंद करुन अचानक रितिकासमोर येताना दिसतो. तो तिला मुठीत काय काय आहे? ते पाहायला सांगताना दिसतो. पण रोहितच्या खोडकर वृत्तीची कल्पना रितिकाला असल्यानं ती सुरुवातीला नकार देते आणि भितीपोटी मुठीला हात लावत नाही. रितिकाच्या चेहऱ्यावरील भाव रोहितनं कॅमेराट टिपले आहेत. अखेर रोहितच्या विनवणीनंतर ती मुठीला स्पर्श करताच रोहित मुठ उघडतो आणि त्यात चॉकलेट असल्याचं पाहून रितिकाला आपण पुन्हा एकदा प्रँकला बळी पडल्याचं कळून चुकतं. त्यानंतर रितिकाही आनंदी होते आणि चॉकलेट घेते. दरम्यान, रोहित शर्माच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तर अनेकांनी कमेंट्स देखील केल्यात. मुंबई इंडियन्स संघाच्या इन्स्टाग्राम पेजवरुनही रोहितला प्रँकस्टार अशी पदवी देणारी कमेंट करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सरोहित शर्मा
Open in App