Join us

IPL, MI vs SRH: रोहित शर्माला गुंडाळतो 'हा' भारतीय गोलंदाज; आज होणार टक्कर

IPL 2021, MI vs SRH: मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलमधील आजवरचा सर्वात यशस्वी संघ आहे. कर्णधार रोहित शर्मा संघासाठी अतिशय महत्वाचा फलंदाज आहे यात कुणाचंही दुमत असू शकत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 19:35 IST

Open in App

IPL 2021, MI vs SRH: मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलमधील आजवरचा सर्वात यशस्वी संघ आहे. कर्णधार रोहित शर्मा संघासाठी अतिशय महत्वाचा फलंदाज आहे यात कुणाचंही दुमत असू शकत नाही. पण आज मुंबईची लढत सनरायझर्स हैदराबादशी होतेय. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर देखील स्फोटक खेळीसाठी ओळखला जातो. 

IPL 2021: ब्रायन लाराला भारताच्या 'या' युवा क्रिकेटपटूचं आयपीएलमध्ये शतक झालेलं पाहायचंय, झालाय मोठा फॅन!

रोहित शर्मा एकदा का मैदानात टिकला की त्याच्या फलंदाजीचं वादळ अनेकदा अनुभवायला मिळालं आहे. पण 'हिटमॅन'ची फलंदाजी आयपीएलमधील एकाच संघासमोर आणि विशेषत: एकाच गोलंदाजासमोर खूप संथ होते. हा गोलंदाज आहे भुवनेश्वर कुमार. 

'भाई अगला मॅच मत खेलना', सांगणाऱ्याची दीपक चहरनं केली बोलती बंद, PBKSविरुद्धची खेळी केली समर्पीत! 

रोहित vs भुवीभुवनेश्वर कुमारच्या स्विंग गोलंदाजीसमोर रोहित शर्माची फलंदाजी संथ होते. आयपीएलमधील आतापर्यंतची आकडेवारीच याची ग्वाही देते. आयपीएलमध्ये रोहितनं आतापर्यंत भुवनेश्वरच्या ३५ चेंडूंचा सामना केला आहे. म्हणजेच जवळपास ६ षटकं खेळली आहेत. यात रोहितला फक्त ४२ धावा करता आल्या आहेत. तर एक वेळा भुवनेश्वरनं रोहितला बाद केलं आहे. विशेष म्हणजे भुवनेश्वरच्या ३५ चेंडूंपैकी १४ चेंडू रोहितनं डॉट काढले आहेत. भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर रोहितला आतापर्यंत फक्त एकच षटकार लगावता आला आहे.  

टॅग्स :रोहित शर्मामुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादभुषण कुमार