चेन्नई : मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमधील पराभवाने होणारी सुरुवात यंदाही कायम राहिली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने गतविजेत्यांना २ गड्यांनी नमवत शानदार विजयी सलामी दिली. हर्षल पटेलने घेतलेले ५ बळी आणि त्यानंतर एबी डीव्हिलियर्सने दिलेला निर्णायक तडाखा विशेष ठरले. सलग नवव्या सत्रात मुंबईने सलामीचा सामना गमावला.आरसीबीच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले हर्षल पटेल आणि एबी डीव्हिलियर्स हेच दोन्ही संघातील फरक ठरले. दोन्ही संघांचे फिरकी गोलंदाज अपयशी ठरले. मात्र वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. मुंबईला मर्यादित धावसंख्येत रोखल्यानंतर विराट कोहली व ग्लेन मॅक्सवेल यांनी चौफेर फटकेबाजी केली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत आरसीबीला चांगल्या स्थितीत आणले. परंतु, जसप्रीत बुमराहने कोहलीला पायचीत पकडले. काही चेंडूंच्या अंतराने मॅक्सवेलही परतल्याने मुंबईकरांनी पुनरागमन केले. परंतु, एबीला पाचव्या क्रमांकावर खेळविण्याची आरसीबीची चाल यशस्वी ठरली. एबीने २७ चेंडूंत ४८ धावांचा निर्णायक तडाखा दिला.त्याआधी, वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने मुंबईची मधली फळी उध्वस्त करत ५ बळी घेतले. सलामीवीर ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव व इशान किशन यांच्यामुळे मुंबईला समाधानकारक मजल मारता आली. कर्णधार रोहित शर्मा धावबाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या व किएरॉन पोलार्ड अपयशी ठरल्याने मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.रोहित ‘अब तक ३६’‘हिटमॅन’ रोहित शर्मा धावबाद झाला आणि मुंबईला चौथ्या षटकात पहिला धक्का बसला. यासह रोहितच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. रोहित तब्बल ३६ व्यांदा धावबाद झाला असून, यासह तो आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा धावबाद होणारा फलंदाज ठरला. रोहित यापैकी ११ वेळा स्वत:च्या चुकीने, तर २५ वेळा सहकाऱ्याच्या चुकीमुळे धावबाद झाला. मुंबईविरुद्ध ५ बळी घेणारा हर्षल पटेल पहिला गोलंदाज ठरला.आयपीएलमध्ये ६ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली पहिला फलंदाज आणि कर्णधार ठरला.या पराभवानंतरही मुंबई आणि आरसीबी यांच्यातील जय-पराजयाचे समीकरण १७-११ असे मुंबईच्याच बाजूने आहे.मुंबईने २०१३ सालापासून एकदाही सलामीचा सामना जिंकलेला नाही.चेन्नईत याआधीचे सलग पाच सामने जिंकल्यानंतर मुंबईचा पहिला पराभव.आरसीबीने चेन्नईत सलग पाच पराभव पत्करल्यानंतर पहिला विजय मिळवला.मुंबई : स्कोर १५९/९ । ओवर २० । एक्स्ट्रा ४खेळाडू धावा चेंडू स्ट्राईक ४/६ रोहित शर्मा : धावबाद १९ १५ १२६ १/१ख्रिस लिन : झे. व गो. वॉशिंग्टन ४९ ३५ १४० ४/३ सूर्यकुमार : झे. डिव्हिलियर्स गो..जेमिसन ३१ २३ १३४ ४/१ईशान किशन : पायचित गो. पटेल २८ १९ १४७ २/१हार्दिक पांड्या : पायचित गो. पटेल १३ १० १३० २/०किराेन पोलार्ड : झे.सुंदर गो. पटेल ७ ९ ७७ १/०कृणाल पांड्या : झे. ख्रिस्टियन गो. पटेल ७ ७ १०० १/०मार्को जॅन्सेन : बोल्ड गो. पटेल ० २ ०० ०/०राहुल चाहर : धावबाद ० ० ०० ०/० जसप्रीत बुमराह नाबाद १ २ ५० ०/० गोलंदाज षटक डॉट धावा बळी मेडनसिराज ४ १२ २२ ० ०जेमिसन ४ १३ २७ १ ० चहल ४ ८ ४१ ० ०अहमद १ ० १४ ० ०पटेल ४ १२ २७ ५ ०ख्रिस्टियन २ ३ २१ ० ०वॉशिंग्टन १ २ ७ १ ०बँगलोर : स्कोर १६०/८ । ओवर २० । एक्स्ट्रा १२खेळाडू धावा चेंडू स्ट्राईक ४/६ वॉशिंग्टन सुंदर : झे. लिन बो. के. पांड्या १० १६ ६६ ०/०विराट कोहली : पायचित गो. बुमराह ३३ २९ ११३ ४/० पाटीदार : बोल्ड गो. बोल्ट ८ ८ १०० १/०ग्लेन मॅक्सवेल : झे. लिन गो. जॅन्सेन ३९ २८ १३९ ३/२डिव्हिलियर्स धावबाद ४८ २७ १७७ ४/२शाहबाज अहमद : झे. पांड्या गो. जॅन्सेन १ २ ५० ०/०डॅनियल ख्रिस्टियन : झे. चाहर गो. बुमराह १ ३ ३३ ०/०जेमिसन : धावबाद ४ ४ १०० ०/०हर्षल पटेल: नाबाद ४ ३ १३३ ०/० मोहम्मद सिराज नाबाद ० १ ०० ०/०
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2021 MI vs RCB: आरसीबीत ‘हर्षल’लहर; पुन्हा मुंबई इंडियन्सची अपयशी सुरुवात
IPL 2021 MI vs RCB: आरसीबीत ‘हर्षल’लहर; पुन्हा मुंबई इंडियन्सची अपयशी सुरुवात
पटेलने बाद केला अर्धा संघ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 5:40 AM