ग्लेन मॅक्सवेल आणि कायले जेमिन्सन या खेळाडूंसाठी मोठी रक्कम मोजून आयपीएल लिलावात ( IPL 2021 Auction) धुरळा उडवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाला मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज जोश फिलिप ( Josh Philippe) यान इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. त्याला रिप्लेसमेंट म्हणून RCBन न्यूझीलंडचा उद्योन्मुख खेळाडू फिन एलन ( Finn Allen) याला करारबद्ध केलं आहे. एलनला आयपीएल लिलावात कुणीच खरेदी केले नाही. २० लाख ही त्याची बेस प्राईज होती. रिषभ पंतची गरूड झेप; एकाही भारतीय यष्टिरक्षकाला जे जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं!
जोश फिलिपनं माघार घेतल्यानंतर RCBनं ट्विट केलं की,''जोश फिलिपनं वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्याचे सांगताना आम्हाला दुःख होतेय. त्याची रिप्लेसमेंट म्हणून आघाडीचा फलंदाज फिन एलन याला करारबद्ध केले आहे.'' ऑस्ट्रेलियाच्या जोश फिलिपनं २०२०च्या आयपीएल पर्वातून पदार्पण केलं आणि पाच सामन्यांत त्यानं ७८ धावा केल्या. तेच फिन एलननं न्यूझीलंडकडून १२ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तीन अर्धशतक झळकावली आहेत. त्यानं न्यूझीलंडच्या सुपर स्मॅश ट्वेंटी-20 लीगमध्ये तुफान फटकेबाजी केली आहे.