IPL 2021 : वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् भारतीय खेळाडूनं घेतला आयपीएल सोडण्याचा निर्णय

भारतात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांच्या संख्या भर पडत आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2021) अनेक परदेशी खेळाडूंनीही माघार घेतली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 03:13 PM2021-04-28T15:13:18+5:302021-04-28T15:15:14+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: RP Singh to leave the commentators’ bio bubble after his father tests positive for COVID-19 | IPL 2021 : वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् भारतीय खेळाडूनं घेतला आयपीएल सोडण्याचा निर्णय

IPL 2021 : वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् भारतीय खेळाडूनं घेतला आयपीएल सोडण्याचा निर्णय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांच्या संख्या भर पडत आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2021) अनेक परदेशी खेळाडूंनीही माघार घेतली. भारताचा व दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) यानंही त्याच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाल्यानंतर आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्याआधी लायम लिव्हिंगस्टोन, अॅडम झम्पा, अँड्य्रू टाय व केन रिचर्डसन यांनीही भारतातील बिकट होत चाललेली परिस्थिती लक्षात मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. आता भारताचा माजी गोलंदाज आर पी सिंग ( RP Singh) यानंही आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्याच्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि तो सध्या आयपीएल २०२१ मध्ये समालोचक म्हणून काम पाहत आहे.

वर्ल्ड कप विजेता आर पी सिंग यानं २०१८मध्ये निवृत्तीनंतर अनेक चॅनेलवर समालोचक म्हणून काम करतो. आयपीएल २०२१साठी स्टार स्पोर्ट्सनं त्याला हिंदी समालोचक पॅनलसाठी आरपी सिंगला करारबद्ध केले होते. हे सर्व बायो बबलमध्ये राहत होते. वडिलांची प्रकृती सुधारल्यानंतर तो पुन्हा आयपीएलच्या बायो बबलमध्ये परतणार आहे. आकाश चोप्रा, निखिल चोप्रा, अजित आगरकर, इऱफान पठाण, पार्थिव पटेल, गौतम गंभीर, सुनील गावस्कर आणि दीप दासगुप्ता हे हिंदी समालोचकाच्या पॅनेलमध्ये आहेत.   

धोनीच्या आई-वडिलांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली, रुग्णालयातून डिस्चार्ज
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या आई आणि वडिलांनी कोरोनावर मात केली आहे. दोघांनाही मंगळवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोघंही रांची येथील त्यांच्या राहत्या घरी आराम करत आहेत. धोनीचे वडील पान सिंग आणि आई देवकी यांना २१ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दोघांनाही रांची येथील पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दोघांनाही सौम्य लक्षणं असल्यानं घाबरण्याची कोणतीही गरज नसल्याचं डॉक्टरांनी याआधीच जाहीर केलं होतं. अखेर मंगळवारी दोघांचीही कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 

Web Title: IPL 2021: RP Singh to leave the commentators’ bio bubble after his father tests positive for COVID-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.