IPL 2021 : सॅम कुरननं फेकला 'मून बॉल'; RRचा फलंदाज चेंडू टोलवण्यासाठी पाहा कुठे पळत गेला, Video

एक मजेशीर किस्साही घडला. CSKचा गोलंदाज सॅम कुरन ( Sam Curran) यानं टाकलेला मून बॉल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 03:50 PM2021-10-03T15:50:32+5:302021-10-03T15:50:58+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, RR vs CSK : Sam Curran’s Moon Ball Leaves Everyone In Splits; Phillips Plays Along By Trying To Run After It Video | IPL 2021 : सॅम कुरननं फेकला 'मून बॉल'; RRचा फलंदाज चेंडू टोलवण्यासाठी पाहा कुठे पळत गेला, Video

IPL 2021 : सॅम कुरननं फेकला 'मून बॉल'; RRचा फलंदाज चेंडू टोलवण्यासाठी पाहा कुठे पळत गेला, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Rajasthan Royals vs Chennai Super Kings Live Updates : चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यात धावांचा पाऊस पडला. ऋतुराज गायकवाडनं ( Ruturaj Gaikwad) अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून आयपीएलमधील त्याचे पहिले शतक झळकावले. CSKनं उभ्या केलेल्या धावांच्या प्रत्युत्तरात RR दडपणाखाली जाईल, असे वाटत होते. पण, राजस्थाननं हा सामना सहज जिंकला. CSKकडून ऋतुराज व रवींद्र जडेजा भिडले आणि त्यांना RRच्या शिवम दुबे ( Shivam Dube) व यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) या 'मुंबई'कर फलंदाजांनी चोख प्रत्युत्तर दिले. पण, या सामन्यात एक मजेशीर किस्साही घडला. CSKचा गोलंदाज सॅम कुरन ( Sam Curran) यानं टाकलेला मून बॉल...

या सामन्यात.ऋतुराजनं  ६० चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह नाबाद १०१ धावा चोपल्या, तर जडेजानं १५ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३२ धावा कुटल्या. चेन्नईनं ४ बाद १८९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, यशस्वी जैस्वालनं २१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारासह ५० धावा केल्या. शिवम दुबे ४२ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार मारून ६४ धावांवर नाबाद राहिला.  RRनं ७ विकेट्स व १५ चेंडू राखून ही मॅच जिंकली.

राजस्थान रॉयल्सच्या डावातील १७व्या षटकातील पहिला चेंडू सॅम कुरनन इतका विचित्र पद्धतीनं फेकला की त्याला टोलवण्यासाठी RRचा फलंदाज फिलिप्सला दूरवर धावावे लागले.

पाहा व्हिडीओ...

Web Title: IPL 2021, RR vs CSK : Sam Curran’s Moon Ball Leaves Everyone In Splits; Phillips Plays Along By Trying To Run After It Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.