IPL 2021: RR vs DC T20, Live Score Update: दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) राजस्थान रॉयल्ससमोर (Rajasthan Royals) विजयासाठी १४८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्लीकडून रिषभ पंतनं कर्णधारी कामगिरी बजावत ३२ चेंडूत ५१ धावांची खेळी साकारली. पण इतर फलंदाजांकडून रिषभला चांगली साथ मिळू शकली नाही. विशेष म्हणजे वानखेडेच्या मैदानावर दिल्लीच्या संघाला आपल्या डावात आज एकही षटकार लगावता आलेला नाही. राजस्थानच्या गोलंदाजांनी आज दिल्लीच्या फलंदाजांना चांगलंच जखडून ठेवल्याचं पाहायला मिळालं.
IPL 2021: दिल्लीनं दिली ४० ओव्हर्समध्ये द्विशतक ठोकलेल्या युवा भारतीय खेळाडूला संधी, खिळल्या सर्वांच्या नजरा
राजस्थानकडून जयदेव उनाडकट यानं पावर प्लेमध्येच दिल्लीला तीन दमदार झटके दिले. जयदेव उनाडकट यानं त्याच्या ४ षटकांमध्ये केवळ १५ धावा देत तीन बळी घेतले. यात पृथ्वी शॉ (२), शिखर धवन (९) आणि अजिंक्य रहाणे (८) या महत्वाच्या फलंदाजांच्या विकेट्सचा समावेश आहे. दिल्लीचे तीन फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर मिस्तफिजूर रेहमान यानं दिल्लीला चौथा धक्का देत मार्कस स्टॉयनिस (०) याला खातंही उघडू दिलं नाही.
अनुभव असूनही संघात नव्हता, आज संधी मिळाली अन् त्यानं दाखवून दिलं; दिल्लीला दिले धक्के!
दिल्लीची ४ बाद ३७ अशी केविलवाणी परिस्थिती असताना रिषभ पंत यानं दमदार फलंदाजी करत ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. संघाला पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी रिषभ प्रयत्न करत असतानाच रियान पराग यानं जबरदस्त डायरेक्ट हिट मारत रिषभला धावचीत केलं. दिल्लीकडून पदार्पण करत असलेल्या ललित यादवनं २० धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या षटाकांमध्ये टॉम कुरन (२१), ख्रिस वोक्स (नाबाद १५) यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला.
Web Title: IPL 2021 RR vs DC T20 Live delhi capitals sets 148 runs target against rajasthan royals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.