ipl 2021 t20 RR Vs KKR live match score updates Mumbai : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मागील तीन दिवस धावांचा पाऊस पडलेला क्रिकेटरसिकांनी पाहिला. पण, शनिवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders) सामन्यात धावांचा दुष्काळ अनुभवला. याचं श्रेय राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना दिलं गेलं पाहिजे. RCBविरुद्ध १७७ धावांचा बचाव करण्यात पुरते अपयशी ठरलेल्या याच गोलंदाजांनी आज CSKविरुद्ध २०२ धावा चोपणाऱ्या KKRला १३३ धावांवरच रोखले. त्यानंतर संजू सॅमसननं कोणतीच घाई न करता संयमानं संघाचा विजय साकारला. चेतन सकारियाची फ्लाईंग कॅच अन् रियान परागचं सेल्फी सेलिब्रेशन; Video
IPL 2021, RR Vs KKR T20 Match Highlight :
- शुबम गिलनं आज पुन्हा निराश केलं. आजच्या सामन्यात त्याला ७ धावांवर जीवदान मिळाले होते. त्यानंतर त्याला एका धावेसाठी स्वतःची विकेट फेकण्याची काहीच गरज नव्हती. नितीश राणा व राहुल त्रिपाठी यांच्यावर अवलंबून राहणे KKRला महागात पडत आहे.
- सुनील नरिनला मिळालेल्या बढतीचा फायदा उचलता आला नाही. कर्णधार इयॉन मॉर्गनही शाळकरी मुलासारखी चूक करून माघारी परतला. त्रिपाठी, दिनेश कार्तिक यांची फलंदाजी वगळता KKRला अन्य खेळाडूंनी तोंडावर पाडले.
- चेन्नईविरुद्ध स्फोटक खेळी करणारा आंद्रे रसेल आज ख्रिस मॉरिसच्या स्लोव्हर चेंडूवर फसला अन् काहीच कमाल न करता माघारी परतला. जयदेव उनाडकट ( १-२५), चेतन सकारिया ( १-३१) व मुश्ताफिजून रहमान ( १-२२) यांची टिच्चून मारा केला. राहुल टेवाटिया व शिवम दुबे यांनीही त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. वर्ल्ड कप विजेता कर्णधार असा विचित्र बाद होऊ शकतो?; इयॉन मॉर्गनच्या विकेटनंतर KKRनं डोक्यावर मारला हात, Video
- ख्रिस मॉरिसनं अखेरच्या दोन षटकांत चार विकेट्स घेत RRला बंपर लॉटरी जिंकून दिली. दिनेश कार्तिक, आंद्र रसेल, पॅट कमिन्स व शिवम मावी यांना बाद करून मॉरिसनं खऱ्या अर्थानं सामना RRच्या खिशात घातला.
- माफक लक्ष्य समोर असताना कोणतीच घाई न करता संयमानं खेळ करण्याचा डाव RRनं आखला अन् तो अमलात आणलाही. जोस बटलर व राहुल टेवाटिया यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी संयमी खेळ करताना धावा व चेंडू यांना शर्यतीत सोबतच ठेवले.
- आक्रसताळेपणाचे फटके मारून घात करून घेणारा संजू सॅमसन आज खऱ्या अर्थानं कॅप्टन्स इनिंग खेळला. त्यानं शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल व डेव्हिड मिलर यांच्यासह छोट्या छोट्या भागीदारी करून RRचा विजय पक्का केला. KKRनं आंद्रे रसेलला गोलंदाजी का करू दिली नाही, हा प्रश्न सर्वांना नक्की सतावत असावा.
- या पराभवानंतर KKRनं फलंदाजीत व गोलंदाजीत बदल करण्याची गरज आहे. पाचपैकी चार सामन्यांत त्यांनी पराभव पत्करला आहे आणि पुढेही अशीच अधोगती राहिल्यास त्यांना प्ले ऑफचे गणित गाठणए अवघड होऊन बसेल. आता इतिहासाप्रमाणे कोलकाता संघात पुन्हा कर्णधार बदलाचे वारे वाहू लागले नाहीत मग मिळवलं...