RR vs PBKS, IPL 2021, Match Preview: आयपीएलच्या यंदाच्या मोसमातली चौथी लढाई राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात सोमवारी रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. दोन्ही संघांमधली महत्वाची बाब म्हणजे दोन्ही कर्णधारांच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे. राजस्थान रॉयल्सनं यंदाच्या लिलावात स्टीव्ह स्मिथ याला करारमुक्त केल्यानंतर संघानं भारताचा नव्या दमाचा खेळाडू संजू सॅमसन याच्याकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा दिली आहे. तर दुसरीकडे पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार लोकेश राहुल याला आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. (ipl 2021 rr vs pbks dream11 team prediction tips probable playing 11 details)
भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेत निराशाजनक कामगिरीमुळे लोकेश राहुल याला संघातलं स्थान गमवावं लागलं होतं. त्यामुळे योग्यता सिद्ध करुन दाखविण्यासाठी लोकेश राहुल याला आयपीएलचं व्यासपीठ अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे संजू सॅमसन आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुनही भारतीय संघात आपलं स्थान अद्याप पक्क करू शकलेला नाही. त्यात आता संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी दिल्यानंतर संजू कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
राजस्थान रॉयल्ससमोरील सर्वात मोठी अडचण म्हणजे संघाचा मुख्य गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त असल्यामुळे सामन्याला मुकणार आहे. पण यंदा राजस्थानच्या संघानं आयपीएल लिलावात इतिहासातली सर्वात मोठी बोली लावून अष्टपैलू ख्रिस मॉरिस याला १६.५ कोटी रुपयांमध्ये संघात दाखल करून घेतलं आहे. त्यामुळे ख्रिस मॉरिसच्या खेलीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. राजस्थानच्या फलंदाजीची धुरा संजू सॅमसन, जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांच्यावर असणार आहे.
पंजाब किंग्ज संघाकडे लोकेश राहुलसोबत धडाकेबाज ख्रिस गेल, मयांक अग्रवाल आणि आयसीसीच्या टी-२० क्रमवारीतील अव्वल फलंदाज डेव्हिड मलान यांचा भरणा आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार इतकं नक्की.
संभाव्य संघ (Playing 11)
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)जोस बटलर (यष्टीरक्षक) Jos Buttler (Wk), यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal), संजू सॅमसन (कर्णधार) (Sanju Samson (Captain), मनन वोहरा (Manan Vohra), बेन स्टोक्स (Ben Stokes), ख्रिस मॉरिस (Chris Morris), राहुल तेवतिया (Rahul Tewatia), श्रेयस गोपाल (Shreyas Gopal), जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat), कार्तिक त्यागी (Kartik Tyagi), मयांक मार्केंडे (Mayank Markande)
पंजाब किंग्ज (Punjab Kings) ख्रिस गेल (Chris Gayle), मयांक अग्रवाल (Mayank Agarwal), केएल राहुल (KL Rahul (Captain, Wk), निकोलस पुरन (Nicholas Pooran), मनदीप सिंग (Mandeep Singh), जलाज सक्सेना (Jalaj Saxena), मोईसेस हेन्रिकस (Moises Henriques), इशान पोरेल (Ishan Porel), रवि बिश्नोई (Ravi Bishnoi), मोहम्मद शमी (Mohammed Shami), झाय रिचर्डसन (Jhye Richardson)