IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update : दीपक हुडा ( Deepak Hooda), लोकेश राहुल ( KL Rahul) आणि ख्रिस गेल ( Chris Gayle) या त्रिकुटानं राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. दीपक हुडा व लोकेश राहुल या जोडीनं ४७ चेंडूंत १०५ धावांची भागीदारी करताना पंजाब किंग्सला ( Punjab Kings) दोनशेपार धावा करून दिल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये दोनशेपार धावांची ही पहिलीच खेळी ठरली. लोकेश राहुलला शतकानं हुलकावणी दिली. ५० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह तो ९१ धावांवर माघारी परतला. राहुल टेवाटियानं सीमारेषेवर अफलातून झेल टिपला. IPL 2021 : RR vs PK T20 Live Score Update
लोकेश राहुलला दोन जीवदान RRला महागात पडलेसौराष्ट्रच्या चेतन सकारीयानं राजस्थान रॉयल्ससाठी पहिलं षटक फेकलं. पदार्पण करणाऱ्या मुश्ताफिजूर रहमान यानं टाकलेल्या दुसऱ्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लोकेश राहुल ( KL Rahul) पायचीत असल्याची अपील झाली. DRS घेऊ की नको यासाठी थोडीचर्चा झाली, परंतु कर्णधार संजू सॅमसननं DRS घेतला नाही. त्यानंतर रिप्लेत लोकेश बाद असल्याचे दिसत होते आणि ही चूक राजस्थानला महागात पडू शकते. पण, चेतन सकारियानं ( Chetan Sakariya) तिसऱ्या षटकात पंजाबला धक्का दिला. त्यानं मयांक अग्रवालला ( १४) यष्टिरक्षक संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. ७व्या षटकात बेन स्टोक्सनं लोकेश राहुलचा झेल सोडला. ipl 2021 t20 RR vs PBKS live match score updates Mumbai दीपक हुडाची फटकेबाजी पाहून RRला भरली 'हुडहुडी'; आयपीएल इतिहासात नोंदवला मोठा विक्रम
३५० षटकारांचा विक्रम अन् ४१ वर्षीय गेलची फटकेबाजीराहुल टेवाटियानंही त्याच्याच गोलंदाजीवर गेलचा झेल सोडला. गेलनं या सामन्यात मोठा विक्रम केला आहे आणि आयपीएलमध्ये हा विक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. गेलनं आयपीएलमध्ये ३५० षटकारांचा विक्रम केला. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स ( २३७), महेंद्रसिंग धोनी ( २१६), रोहित शर्मा ( २१४), विराट कोहली ( २०१) यांचा क्रमांक येतो. रियान परागनं ( Riyan Parag) १०व्या षटकात गेलला माघारी जाण्यास भाग पाडले. २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४० धावा करणाऱ्या गेलचा झेल बेन स्टोक्सनं टिपला. गेल व राहुलची ४५ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी संपुष्टात आली. IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update वडील टेम्पो चालक, तीन महिन्यांपूर्वी भावानं केली आत्महत्या अन् आज RR कडून पदार्पणात घेतली मोठी विकेट
दीपक हुडानं चोपल्या १० चेंडूंत ५२ धावादीपक हुडानं PBKSच्या ताफ्यातील वातावरणच बदललं. त्यानं २८ चेंडूंत ६४ धावा कुटल्या. त्यापैकी ५२ धावा या केवळ चौकार व षटकारानं आल्या ( ४ चौकार व ६ षटकार) . दरम्यान लोकेश राहुलनंही पंजाबकडून २००० धावा पूर्ण केल्या. पंजाब किंग्सनं २० षटकांत ६ बाद २२१ धावांचा डोंगर उभा केला.