Join us  

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : ५० चेंडूंत ९१ धावा; राहुल टेवाटियाच्या अफलातून झेलमुळे लोकेश राहुलचं शतक हुकलं, Video

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live :दीपक हुडा व लोकेश राहुल या जोडीनं ४७ चेंडूंत १०५ धावांची भागीदारी करताना पंजाब किंग्सला ( Punjab Kings) दोनशेपार धावा करून दिल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 10:06 PM

Open in App

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update : दीपक हुडा ( Deepak Hooda), लोकेश राहुल ( KL Rahul) आणि ख्रिस गेल ( Chris Gayle) या त्रिकुटानं राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. दीपक हुडा व लोकेश राहुल या जोडीनं ४७ चेंडूंत १०५ धावांची भागीदारी करताना पंजाब किंग्सला ( Punjab Kings) दोनशेपार धावा करून दिल्या. लोकेश राहुलला शतकानं हुलकावणी दिली. ५० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह तो ९१ धावांवर माघारी परतला. अखेरच्या षटकात लोकेश शतक पूर्ण करेल असं वाटत असताना राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) अफलातून झेल टिपला. RRच्या चेतन सकारियानं ३१ धावांत ३ विकेट्स अन् एक अफलातून झेल घेत आपली छाप सोडली. IPL 2021 : RR vs PK T20 Live Score Update

This is sensational! 👏👏

Chetan Sakariya leaps towards his left & takes a ripper of a catch! 😎😎 #VIVOIPL vivo #RRvPBKS Rajasthan Royals

Watch that brilliant fielding effort 🎥 👇

Posted by IPL - Indian Premier League on Monday, April 12, 2021

लोकेश राहुलला दोन जीवदान मिळाले आणि त्याचाच फटका RRला बसला. ४१ वर्षीय ख्रिस गेलनं आजच्या सामन्यात ३५०वा षटकार खेचून आयपीएलमध्ये मोठा विक्रम नावावर केला. २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४० धावा करणाऱ्या गेलचा झेल बेन स्टोक्सनं टिपला.  गेल माघारी परतल्यानंतर निकोलस पूरन येणं अपेक्षित होतं, पंरतु PBKS नं स्ट्रॅटेजी बदलली अन् दीपक हुडाला ( Deepak Hooda) पुढे पाठवले आणि त्यानं षटकारांची आतषबाजी करताना हा निर्णय योग्य ठरवला. ४० धावांवर असताना जोस बटलरनं दीपकला जीवदान दिलं. दीपक हुडानं  २८ चेंडूंत ६४ धावा कुटल्या. त्यापैकी ५२ धावा या केवळ चौकार व षटकारानं आल्या ( ४ चौकार व ६ षटकार). दरम्यान लोकेश राहुलनंही पंजाबकडून २००० धावा पूर्ण केल्या.  पंजाब किंग्सनं २० षटकांत ६ बाद २२१ धावांचा डोंगर उभा केला.

टॅग्स :आयपीएल २०२१पंजाब किंग्सराजस्थान रॉयल्सलोकेश राहुल