IPL 2021, RR vs PBKS : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील आतापर्यंतचा सर्वात थरारक सामना म्हणून राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स ( Rajasthan Royals vs Punjab Kings) याची नोंद होईल. लोकेश राहुल ( KL Rahul), दीपक हुडा ( Deepak Hooda) आणि ख्रिस गेल ( Chris Gayle ) यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पंजाब किंग्सनं ( PBKS) २२१ धावांचा डोंगर उभा केला. पण, राजस्थान रॉयल्सचा ( RR) नवा कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) एकटा भिडला आणि ११९ धावांची खेळी करून कडवी टक्कर दिली. पंजाबनं हा सामना अवघ्या ४ धावांनी जिंकला. संजू सॅमसन काय खेळला...! १९ चेंडूंत चोपल्या ९० धावा; विक्रमी शतकासह सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या पंक्तीत स्थान
लोकेश राहुलनं ५० चेंडूंत ९१ धावा, दीपक हुडानं २८ चेंडूंत ६४ धावा आणि गेलनं ४० धावा केल्या. पंजाबनं ६ बाद २२१ धावा केल्या. प्रत्युत्तरात RRच्या संजू सॅमसननं ६३ चेंडूंत १२ चौकार व ७ षटकार खेचून ११९ धावांची खेळी केली, परंतु RRला ७ बाद २१७ धावांपर्यंत मजल मारता आली. सॅमसन वगळता RRच्या एकाही फलंदाजाला ३० धावांचा पल्ला ओलांडता आला नाही. वानखेडेच्या गॅलरीतून तिनं केलं Hi अन् नेटिझन्स विचारताय ती कोण हाय, ती कोय हाय?
प्रीती झिंटानं केलं अभिनंदन पण... ( Preity Zinta extends her congratulations to the Punjab Kings)पंजाब किंग्सच्या या थरारक विजयानंतर सह मालकिण प्रीती झिंटानं लोकेश राहुल व संघाचे अभिनंदन केलं. तिनं ट्विट केलं की,''नवं नाव, नवी जर्सी तरीही हा संघ मला हार्ट अटॅक देण्याची संधी सोडत नाही. संघासाठी ही चांगली सुरूवात नाही, परंतु विजय मिळवला त्याचा आनंद आहे. संजू सॅमसनच्या खेळीचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे.'' दीपक हुडानं २८ चेंडूंत कुटल्या ६४ धावा अन् कृणाल पांड्या होतोय ट्रोल; झाला होता मोठा राडा!
यूएईत झालेल्या १३व्या पर्वात पंजाबला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांना आतापर्यंत केवळ दोनवेळाच बाद फेरीत प्रवेश करता आला, तर २०१४मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.