IPL 2021 : RR vs PK T20 Live Score Update : लोकेश राहुलच्या ( KL Rahul) नेतृत्वाखालील पंजाब किंग्स ( Punjab Kings) व संजू सॅमसनच्या ( Sanju Samson ) नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात आज सामना रंगणार आहे. राजस्थान संघाची भिस्त अष्टपैलू बेन स्टोक्सवर ( Ben Stokes) अवलंबून राहील. इंग्लंडचा जोस बटलर व नवनियुक्त कर्णधार सॅम्सनही चांगली सुरुवात करण्यास उत्सुक असतील. पंजानं आजच्या सामन्यात तीन करोडपती खेळाडूंना मैदानावर उतरवले आहे. आयपीएल २०२१च्या लिलावात पंजाब किंग्सनं या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लावली होती आणि ते आज पदार्पण करत आहेत. IPL 2021 : RR vs PK T20 Live Score Update
- पंजाब किंग्सकडून तीन खेळाडूंचे पदार्पण - शाहरूख खान, रिली मेरेडीथ आणि झाय रिचर्डसन
- राजस्थान रॉयल्सकडून दोघांचे पदार्पण - मुस्ताफिजूर रहमान व शिवम दुबे
राजस्थान रॉयल्स - मनन वोह्रा, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, जोस बटलर, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवाटिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाळ, सी सकारिया, मुस्ताफिजूर रहमान
पंजाब किंग्स - लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरण, दीपक हुडा, शाहरुख खान, झाय रिचर्डसन, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, रिली मेरेडीथ, ए सिंग
कोण आहे शाहरुख खान?तामिळनाडूच्या शाहरूख खानची बेस प्राइज अवघी २० लाख रुपये होती आणि त्याला तब्बल ५ कोटी २० लाखांची बोली लावून पंजाब किंग्ज संघानं त्याला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं. शाहरुख खान हा तामिळनाडूचा युवा फलंदाज असून सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत त्यानं दमदार कामगिरी केली आहे. त्यानं २२० च्या स्ट्राईक रेटनं तुफान फटकेबाजी केली होती. बॉलिवूड स्टार शाहरुख खान याच्या नावावरूनच या क्रिकेटपटूचं नाव ठेवण्यात आलं असलं तर तो रजनीकांत याचा जबरा फॅन आहे. २७ मे १९९५मध्ये चेन्नईतील त्याचा जन्म झाला. कमी वयातच त्यानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. शालेय स्तरावर तो डॉन बॉस्को आणि सेंट बेड्स या दोन संघांकडून क्रिकेट केळायचा. वयाच्या १३ व्या वर्षी त्यानं तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या लीगमधून पदार्पण केलं. आक्रमक फलंदाजीमुळे तो नेहमी चर्चेत राहिला. ipl 2021 t20 RR vs PK live match score updates Mumbai