Join us  

IPL 2021, RR vs RCB Live Updates : रियान परागनं 'पंगा' घेतला, विराट कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला, Video 

युझवेंद्र चहलनं १८ धावांत २, शाहबाज अहमदनं १० धावांत २ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलनं ३४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या या पर्वात हर्षलनं २६ विकेट्स घेतल्या आहेत आणि आयपीएल इतिहासात एकाच पर्वात अनकॅप गोलंदाजानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी युझवेंद्र चहलनं २०१५च्या पर्वात २३ विकेट्स घेतल्या होत्या. RCBकडून एकाच पर्वात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही हर्षलनं आज मोडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 10:49 PM

Open in App

IPL 2021, Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या ( Royal Challengers Bangalore) गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या ( Rajasthan Royals) सामन्यात दमदार पुनरागमन केलं. त्यानंतर RCBच्या फलंदाजांकडूनही दमदार खेळ झाला. विराट कोहली सलग तिसरं अर्धशतक झळकावले अशी अपेक्षा होती, परंतु RRच्या रियान परागनं अफलातून फिल्डिंग करताना RCBच्या कर्णधाराला घरचा रस्ता दाखवला. 

यशस्वी जैस्वाल व एव्हिन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी ७७ धावा जोडल्या. यशस्वीनं २२ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३१ धावा केल्या.  लुईसनं ३७ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५८ धावा केल्या. त्यानंतर बघताबघता राजस्थानचा डाव गडगडला. शाहबाज अहमदनं एकाच षटकात दोन धक्के दिले. त्यानंतर युझवेंद्र चहलनं कमाल दाखवली. हर्षलनं अखेरच्या षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या, पण यावेळी त्याची हॅटट्रिक हुकली. पण, अखेरच्या चेंडूवर त्यानं आणखी एक विकेट घेतली. बिनबाद ७७ धावांवर असणाऱ्या RRच्या ९ विकेट्स त्यांनी पुढील ७२ धावांत टिपले. राजस्थानला ९ बाद १४९ धावांवर समाधान मानावे लागले. 

गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर आता RCBच्या फलंदाजांची जबाबदारी होती. कर्णधार विराटनं  पहिल्याच षटकात ख्रिस मॉरिसला तीन सुरेख चौकार खेचून इरादा स्पष्ट केला. देवदत्त पडिक्कलसह त्यानं पहिल्या विकेट्ससाठी ४८ धावा जोडल्या. मुस्ताफिजूर रहमाननं ही विकेट घेतली, परंतु विराटचा झंझावात RRला रोखणं अवघड जात होतं. पण, ७व्या षटकात विराट ( २५) धावबाद झाला. रियान परागनं अफलातून फिल्डींग केली. 

पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :आयपीएल २०२१विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्स
Open in App