Join us  

IPL 2021, RR vs RCB Live Updates : विराट कोहलीनं इंग्लंडच्या गोलंदाजाला उतरवले मैदानात, IPLमध्ये करतोय पदार्पण

IPL 2021, Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Live Updates : आयपीएल २०२१च्या साखळी गटातील सामन्याच्या आता अंतिम टप्प्यात सर्व संघांना प्ले ऑफच्या दिशेनं प्रत्येक पाऊल सावधतेनं टाकावं लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 7:06 PM

Open in App

IPL 2021, Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Live Updates : आयपीएल २०२१च्या साखळी गटातील सामन्याच्या आता अंतिम टप्प्यात सर्व संघांना प्ले ऑफच्या दिशेनं प्रत्येक पाऊल सावधतेनं टाकावं लागणार आहे. १६ गुणांची कमाई करणारे दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्स यांचेही प्ले ऑफमधील स्थान अद्याप निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे १२ गुण असलेल्या रॉयल चॅलेंजर्स व ८ गुण असलेल्या राजस्थान रॉयल्सला आणखी जबाबदारीनं खेळावं लागणार आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB यंदाचा जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्यासमोर आज संजू सॅमसनच्या युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या RRचे आव्हान आहे. आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांना लागोपाठ ३ सामन्यांत पराभव पत्करावा लागला. कोलकात्यानं अवघ्या ९२ धावांत आरसीबीचा खुर्दा उडवला. या सामन्यात कोलकात्यानं ९ गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सनं त्यांचा पराभव केला. मुंबईवर विजय मिळवत आरसीबीनं हरवलेला सूर पुन्हा मिळवला. कोहलीनं लागोपाठ दोन अर्धशतकं झळकावली असून ग्लेन मॅक्सवेलनं ३७ चेंडूंत ५६ धावा करत चमक दाखवली. पण,  एबी डिव्हिलियर्सला गेल्या ३ सामन्यांत केवळ २३ धावा करता आल्या आहेत. तर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिन्सनदेखील खराब फॉर्ममध्ये आहे.   RCBनं आजच्या सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज जॉर्ज गार्टन याला पदार्पणाची संधी दिली आहे. त्याच्यासाठी कायले जेमिन्सनला विश्रांती दिली गेली आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ - विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, एबी डिव्हिलियर्स, केएस भरत, ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस्टियन, जॉर्ज गार्टन, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज 

राजस्थान रॉयल्सचा संघ - संजू सॅमसन, एव्हिन लुईस, रियान पराग, यशस्वी जैस्वाल, ख्रिस मॉरिस, लाएम लिव्हिंगस्टोन, राहुल टेवाटिया, महिपाल लोम्रोर, मुश्ताफिजूर रहमान, कार्तिक त्यागी, चेतन सकारीया  

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App