IPL 2021, RR vs RCB Live Updates : विराट अँड टीमची 'रॉयल' कामगिरी; आर श्रीकर, ग्लेन मॅक्सेवलची तुफान फटकेबाजी

गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर आता RCBच्या फलंदाजांची जबाबदारी होती. कर्णधार विराटनं  पहिल्याच षटकात ख्रिस मॉरिसला तीन सुरेख चौकार खेचून इरादा स्पष्ट केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 11:04 PM2021-09-29T23:04:08+5:302021-09-29T23:08:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, RR vs RCB Live Updates : Glenn Maxwell smashes his 4th fifty of the season as RCB hammer RR by seven wickets | IPL 2021, RR vs RCB Live Updates : विराट अँड टीमची 'रॉयल' कामगिरी; आर श्रीकर, ग्लेन मॅक्सेवलची तुफान फटकेबाजी

IPL 2021, RR vs RCB Live Updates : विराट अँड टीमची 'रॉयल' कामगिरी; आर श्रीकर, ग्लेन मॅक्सेवलची तुफान फटकेबाजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या ( Royal Challengers Bangalore) गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या ( Rajasthan Royals) सामन्यात दमदार पुनरागमन केलं. त्यानंतर RCBच्या फलंदाजांकडूनही दमदार खेळ झाला.  आर श्रीकर व ग्लेन  मॅक्सवेल यांनी RRच्या गोलंदाजांना बदडले व संघाला विजय मिळवून देताना प्ले ऑफच्या दिशेनं मजबूत पाऊल टाकले. 

यशस्वी जैस्वाल व एव्हिन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी ७७ धावा जोडल्या. यशस्वीनं २२ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३१ धावा केल्या.  ईसनं ३७ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५८ धावा केल्या. त्यानंतर बघताबघता राजस्थानचा डाव गडगडला. बिनबाद ७७ धावांवर असणाऱ्या RRच्या ९ विकेट्स त्यांनी पुढील ७२ धावांत टिपले. राजस्थानला ९ बाद १४९ धावांवर समाधान मानावे लागले. युझवेंद्र चहलनं १८ धावांत २, शाहबाज अहमदनं १० धावांत २ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलनं ३४ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  

गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर आता RCBच्या फलंदाजांची जबाबदारी होती. कर्णधार विराटनं  पहिल्याच षटकात ख्रिस मॉरिसला तीन सुरेख चौकार खेचून इरादा स्पष्ट केला. देवदत्त पडिक्कलसह त्यानं पहिल्या विकेट्ससाठी ४८ धावा जोडल्या. मुस्ताफिजूर रहमाननं ही विकेट घेतली, परंतु विराटचा झंझावात RRला रोखणं अवघड जात होतं. पण, ७व्या षटकात विराट ( २५) धावबाद झाला. रियान परागनं अफलातून फिल्डींग केली. श्रीकर भरत व ग्लेन मॅक्सवेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून RCBचा डाव सावरला. कोणताच धोका न पत्करता सावध खेळ करत भरत व मॅक्सवेल यांनी RCBची धावसंख्या वाढवली. 

१६व्या षटकात मुस्ताफिजूरनं RCBच्या भरतला ( ४४) बाद करून सामन्यात चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण खेळपट्टीवर सेट झालेल्या मॅक्सवेलनं पुढच्याच षटकात ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर ३ चौकार, १ षटकारासह २२ धावा चोपून काढत ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. RCBनं  १७.१ षटकांत ३ बाद १५३ धावा करून विजय मिळवला. या विजयासह बंगलोरच्या खात्यात १४ गुण जमा झाले आहेत. 

Web Title: IPL 2021, RR vs RCB Live Updates : Glenn Maxwell smashes his 4th fifty of the season as RCB hammer RR by seven wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.