IPL 2021, RR vs RCB Live Updates : RRनं वादळी सुरुवात केली, परंतु ७२ धावांत ९ फलंदाज माघारी परतल्यानं नौका बुडाली!

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसमोर ( RCB) तगडं आव्हान उभं राहिल असेच वाटले होते. पण,

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 09:18 PM2021-09-29T21:18:30+5:302021-09-29T21:22:37+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, RR vs RCB Live Updates : Rajasthan Royals was 77 for 0 from 8.1 overs and then restricted #RR to 149 for 9 from 20 overs | IPL 2021, RR vs RCB Live Updates : RRनं वादळी सुरुवात केली, परंतु ७२ धावांत ९ फलंदाज माघारी परतल्यानं नौका बुडाली!

IPL 2021, RR vs RCB Live Updates : RRनं वादळी सुरुवात केली, परंतु ७२ धावांत ९ फलंदाज माघारी परतल्यानं नौका बुडाली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Live Updates : यशस्वी जैस्वाल व एव्हिन लुईस यांनी ज्या आक्रमकतेनं राजस्थान रॉयल्सला ( RR) सुरुवात करून दिली, ते पाहता रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसमोर ( RCB) तगडं आव्हान उभं राहिल असेच वाटले होते. पण, शाहबाज अहमदच्या एका षटकानं सामना फिरला. RRनं २७ धावांत पटापट ५ फलंदाज गमावले. RCBच्या गोलंदाजांनी रॉयल कामगिरी करताना सामन्यात जबरदस्त कमबॅक केले. युझवेंद्र चहल यानं पुन्हा एकदा त्याची उपयुक्तता सिद्ध केली. शाहबाज अहमद हा सप्राईज पॅकेज ठरला. 

RCBनं नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. यशस्वी जैस्वाल व एव्हिन लुईस यांनी RCBच्या गोलंदाजांना चोपून काढले. यशस्वीनं मारलेला उत्तुंग षटकात खणखणीत होता, तर लुईसही कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या फॉर्मात परतला. आजच्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या जॉर्जला या दोघांनी टार्गेट केलं. त्यानं टाकलेल्या चौथ्या षटकात लुईसनं दोन खणखणीत षटकार व अप्रतिम चौकारासह १८ धावा कुटल्या. RRनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५६ धावा केल्या आणि त्यात लुईसचा ४१ धावांचा वाटा होता. RCBच्या गोलंदाजांनी स्लोव्हर, बाऊन्सर, यॉर्कर असे भात्यातील सर्व अस्त्रांचा वापर करून पाहिला, पण त्याचा उपयोग झालाच नाही. RRच्या फलंदाजांनी टोलवलेले काही उत्तुंग चेंडू झेलण्यासाठी फिल्डरच जागेवर नव्हते. नो मॅन्स लँडवर ते पडत असल्यानं विराट कोहलीही निराश झाला होता.


युवा फलंदाज यशस्वीनं अनुभवी गोलंदाज डॅन ख्रिस्टियन यालाही नाही सोडलं. ९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वीनं खणखणीत षटकार खेचला, परंतु पुढील चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. मिड ऑफवर मोहम्मद सिराजनं त्याला झेल टिपला. यशस्वीनं २२ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३१ धावा केल्या. दुसऱ्या बाजूनं लुईसचा झंझावात कायम राहिला आणि त्यानं ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. लुईसनं त्याला धु धु धुतले त्याच जॉर्जनं विकेटही मिळवली. १२व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर लुईसनं जोरदार फटका मारला, परंतु चेंडू जागच्या जागी उत्तुंग उडाला. यष्टिरक्षक केएस भरतनं सुरेख कॅच टिपला. लुईसनं ३७ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५८ धावा केल्या.
 
महिपाल ( ३) आज काही कमाल करू शकला नाही, चहलनं त्याला यष्टिचीत केलं. पुढच्याच षटकात शाहबाज अहमदनं RRचा कर्णधार संजू सॅमसनला ( १९) माघारी पाठवलं. पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर शाहबाजनं अखेरच्या चेंडूवर राहुल टेवाटियाला ( २) बाद केले. दोन्ही वेळेस देवदत्त पडिक्कलनं झेल टिपले. आता RCBला कमबॅक करण्याची संधी मिळाली.  RRनं २७ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन् इथेच सामन्याला कलाटणी मिळाली. लाएम लिव्हिंगस्टोनची विकेट घेत चहलनं RRला आणखी एक धक्का दिला. चहलनं १८ धावांत २ विकेट्स घेत, पुन्हा दमदार कामगिरी करून दाखवली. RRला २० षटकांत ९ बाद १४९ धावा करता आल्या. हर्षल पटेलला पुन्हा एकदा हॅटट्रिकची संधी होती. त्यानं २०व्या षटकात सलग दोन धक्के दिले. 

Web Title: IPL 2021, RR vs RCB Live Updates : Rajasthan Royals was 77 for 0 from 8.1 overs and then restricted #RR to 149 for 9 from 20 overs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.