IPL 2021 : RR vs SRH T20 Live : कर्णधारपद गेलं अन् संघातील स्थानही; डेव्हिड वॉर्नरशिवाय SRH आज मैदानावर उतरणार

ipl 2021 t20 RR vs SRH live match score updates Delhi : सहा सामन्यांत फक्त एक विजय मिळवणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं IPL 2021च्या मध्यंतराला नेतृत्वबदल केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 03:06 PM2021-05-02T15:06:55+5:302021-05-02T15:11:35+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 :RR vs SRH  T20 Live Score Update : David Warner won't be playing today, SRH have won the toss | IPL 2021 : RR vs SRH T20 Live : कर्णधारपद गेलं अन् संघातील स्थानही; डेव्हिड वॉर्नरशिवाय SRH आज मैदानावर उतरणार

IPL 2021 : RR vs SRH T20 Live : कर्णधारपद गेलं अन् संघातील स्थानही; डेव्हिड वॉर्नरशिवाय SRH आज मैदानावर उतरणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021 t20 RR vs SRH live match score updates Delhi : सहा सामन्यांत फक्त एक विजय मिळवणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं IPL 2021च्या मध्यंतराला नेतृत्वबदल केला. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली SRHचा संघ प्रथमच मैदानावर आज उतरणार आहे आणि त्यांच्यासमोर राजस्थान रॉयस्लचे ( Rajasthan Royals) आव्हान आहे. SRHनं डेव्हिड वॉर्नरकडून ( David Warner) नेतृत्व काढून घेतलेच, शिवाय त्याला आजच्या सामन्यात बाकावर बसवण्याचाही निर्णय घेतला. ( David Warner won't be playing today)  IPL 2021 :RR vs SRH T20 Live Score Update

SRH व RR या दोन्ही संघांना विजयाची अत्यंत गरज असल्याने यावेळी चाहत्यांना तुंबळ लढाईची मेजवानी मिळणार हे नक्की. राजस्थानने आतापर्यंत सहापैकी दोन सामने जिंकले असून दुसरीकडे हैदराबादला सहापैकी केवळ एकच सामना जिंकता आलेला आहे. त्यांचा संघ आता नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळणार असल्याने या संघाकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. त्यामुळे कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजस्थान सातत्याने शानदार खेळ करण्यात अपयशी ठरत आहे. चांगल्या सुरुवातीनंतरही त्यांचा संघ ढेपाळताना दिसला आहे. फलंदाजी पूर्णपणे जोस बटलर आणि संजू सॅमसन यांच्यावर अवलंबून आहे. मात्र दोघांच्याही कामगिरीत सातत्याचा अभाव राहिला आहे. हैदराबादची फलंदाजी  मनीष पांडे, जॉनी बेयरस्टो व केन विलियम्सन यांच्यावर अवलंबून आहे. वॉर्नरने दोन अर्धशतक झळकावली असली, तरी त्याला मोठी खेळी करता आली नाही. गोलंदाजीत एकटा राशिद खान अपेक्षित कामगिरी करण्यात यशस्वी ठरला आहे. 

 

डेव्हीड वॉर्नरची कामगिरी

  • परदेशी खेळाडूंमध्ये सर्वाधिक ५४४७ धावा
  •  २०१५, २०१७ व २०१९ अशी तीन ऑरेंज कॅप नावावर असलेला एकमेव फलंदाज
  • आयपीएलच्या सहा पर्वांत ५००+ धावा करणारा फलंदाज   
     

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad XI) - अब्दुल समद, जॉनी बेअरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, विजय शंकर, मोहम्मद नबी, केदार जाधव, राशिद खान, संदीप शर्मा, भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद ( A Samad, J Bairstow, K Williamson, M Pandey, V Shankar, M Nabi, K Jadhav, R Khan, S Sharma, B Kumar, K Ahmed)
राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals XI) -  जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, अनुज रावत, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल टेवाटिया, ख्रिस मॉरिस, कार्तिक त्यागी, चेतन सकारिया, मुश्ताफिजूर रहमान ( J Buttler, Y Jaiswal, S Samson, A Rawat, D Miller, R Parag, R Tewatia, C Morris, K Tyagi, C Sakariya, M Rahman) 

Web Title: IPL 2021 :RR vs SRH  T20 Live Score Update : David Warner won't be playing today, SRH have won the toss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.