Join us  

IPL 2021: "सुरेश रैनाला चेन्नई सुपर किंग्जनं बाहेर बसवण्याची गरज, त्याच्याऐवजी...", मांजरेकर स्पष्टच बोलले!

IPL 2021: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) दिग्गज फलंदाज सुरेश रैनाबाबत (Suresh Raina) मोठं विधान केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 3:56 PM

Open in App

IPL 2021: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) दिग्गज फलंदाज सुरेश रैनाबाबत (Suresh Raina) मोठं विधान केलं आहे. सुरेश रैना सध्या खराब कामगिरी करत असून त्याला अंतिम ११ जणांच्या यादीतून बाहेर काढण्याची वेळ आली आहे, असं स्पष्ट मत मांजरेकर यांनी व्यक्त केलं आहे. 

'माझी पत्नी मला CSK ची जर्सी घालू देईना', RCB फॅन पत्नीची तक्रार घेऊन पती पोहोचला थेट स्टेडियममध्ये!

"चेन्नई सुपर किंग्जसाठी सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांचा खराब फॉर्म चिंतेचा विषय आहे. रैनाचा तर फॉर्म खूपच वाईट सुरू आहे. त्यामुळे पुढील काळात संघात या दोघांपैकी एकाची निवड करायची झाली तर रैनाऐवजी रायुडूची निवड मी करेन. रैनाला बाहेर बसवून कर्ण शर्माला संघात संधी द्यायला हवी. तसंच रैनाच्या जागेवर आता रवींद्र जडेजाला एक फलंदाज म्हणून प्रमोट करायला हवं", असं संजय मांजरेकर म्हणाले. 

कोहलीनंतर RCBचं नेतृत्त्व कोण करणार? दिग्गज गोलंदाजानं सांगितलं भारतीय खेळाडूचं नाव, संघाचा प्लान तयार!

चेन्नईचा संघ कागदावर खूपच मजबूत दिसतो. संघात ड्वेन ब्रावो आठव्या किंवा नवव्या स्थानावर फलंदाजीला येतो. यावरुन संघातील फलंदाजीची लाइनअप किती दमदार आहे याची प्रचिती येते. त्यामुळे फलंदाजीच्या लाइनअपमध्ये एक बदल करता येईल. फिरकी गोलंदाजीच्या बाबतीत संघ दुबळा दिसून येतो. त्यामुळे एका फलंदाजाला बसवून फिरकीपटू कर्ण शर्मा याला संधी द्यायला हवी, असं संजय मांजरेकर म्हणाले. 

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्ससुरेश रैनाकोलकाता नाईट रायडर्स
Open in App