मुंबई: आयपीएलमध्ये (IPL 2021) आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) आमनेसामने असतील. चेन्नईत हा सामना रंगेल. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं अटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा पराभव केला. तर कोलकात्यानं पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. मुंबई आणि कोलकात्यात आतापर्यंत २७ सामने झाले आहेत. पैकी २१ सामने मुंबई इंडियन्सनं जिंकले आहेत. तर कोलकात्याला केवळ ६ सामन्यांमध्येच विजय मिळवता आला आहे. मागील ५ सामन्यांचा विचार केल्यास मुंबईनं ४ सामन्यांमध्ये सरशी साधली आहे. तर कोलकात्याला केवळ एकाच सामन्यात मुंबईला नमवता आलं आहे. त्यामुळे मुंबईचं पारडं जड मानलं जात आहे. मुंबई आणि कोलकात्याच्या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा आहे ती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकरची (Sara Tendulkar).सारा तेंडुलकर शुभमन गिलची बायको; (सचिनसाठी) गुगलचा 'जावई'शोधआज जगात सर्वाधिक संभ्रमात असणारी व्यक्ती म्हणजे सारा तेंडुलकर आणि हे आम्ही नाही तर सोशल मीडिया म्हणतोय. सोशल मीडिया, विशेषत: फेसबुकवर आज साराचीच हवा आहे. मुंबई वि. कोलकाता सामना असल्यानं साराच सर्वाधिक संभ्रमात आहे, असा शोध नेटकऱ्यांनी लावला आहे. कोलकात्याचा युवा फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांची सोशल मीडियावरील मैत्री सर्वश्रुत आहे. शुबमनच्या फोटोवरील साराच्या कमेंट्सकडे सर्वप्रथम हार्दिक पांड्याचं लक्ष गेलं. पांड्यानं केलेल्या कमेंटमुळे मग सारा आणि शुबमन 'लक्षवेधी' ठरले.दीपक हूडा तुफान खेळला; तेंडुलकरचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडलाऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी करणारा शुबमन गिल कोलकात्याकडून सलामीला येतो. तर साराचा भाऊ अर्जुन तेंडुकरला (Arjun Tendulkar) यंदा मुंबईनं आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मुंबई इंडियन्सकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. त्यामुळे अर्जुनला संधी मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे. पण नेटकऱ्यांना भलतेच प्रश्न पडले आहेत. आज साराचा पाठिंबा नेमका कुणाला? भाऊ खेळत असलेल्या मुंबईला की शुबमन खेळत असलेल्या कोलकात्याला..? त्यामुळेच आजच्या दिवसात जगातील सर्वाधिक संभ्रमात असलेली व्यक्ती म्हणून नेटकऱ्यांनी साराची निवड केली आहे.