मुंबई - आयपीएलमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या लढतीत डेव्हिड मिलरचे अर्धशतक आणि ख्रिस मॉरिसच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सवर ( RR Vs DC) तीन गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात ख्रिस मॉरिसने अखेरच्या क्षणी केलेली फटकेबाजी निर्णायक ठरली होती. दरम्यान, ख्रिस मॉरिसची फटकेबाजी पाहिल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याने पहिल्या लढतीत निर्णायक क्षणी एकेरी धान न घेऊन ख्रिस मॉरिसला (Chris Morris) न दिलेल्या स्ट्राइकबाबत मोठे विधान केले आहे. ( Seeing Chris Morris' storming Batting, Sanju Samson says, Still, I wouldn't have run that single)
ख्रिस मॉरिसने दिल्लीविरुद्ध १८ चेंडूत ३६ धावा फटकावत राजस्थानला विजय मिळवून दिला. या खेळीदरम्यान त्याने चार षटकार खेचले. दरम्यान, सामन्यानंतर पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या चेंडूसाठी एकेरी धाव घेऊन ख्रिस मॉरिसला स्ट्राइक न देण्याबाबत विचारले असता संजू सॅमसन म्हणाला की, मी नेहमीच माझ्या खेळाचे परीक्षण करत असतो. जर पंजाब किंग्सविरुद्धचा तो सामना १०० वेळा खेळलो तरी मी त्या क्षणी एकेरी धाव घेऊन मॉरिसला स्ट्राइक दिली नसती.
संजू सॅमसनने पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीत ११९ धावांची खेळी केली होती. दरम्यान, अखेरच्या दोन चेंडूवर राजस्थानला विजयासाठी ५ धावांची गरत होती. मात्र सामन्यातील पाचव्या चेंडूवर संजू सॅमसनने एकेरी धाव न घेता स्ट्राइक स्वत:कडे ठेवली होती. मात्र त्याचा हा निर्णय चुकला होता. सामन्यातील शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकण्याच्या नादात तो बाद झाला होता. त्याबरोबरच तो सामना राजस्थानला गमवावा लागला होता.
दरम्यान, दिल्लीविरुद्ध ४२ धावांच पाच गडी गमावल्यावर आपल्याला संघाचा विजय कठीण वाटत होता. आमच्याकडे डेव्हिड मिलर आणि ख्रिस मॉरिस होते. मात्र तरीही हे आव्हान कठीण होईल, असे वाटत होते. मी ड्रेसिंग रूममध्ये बसून मॉरिसने अजून एक षटकार मारावा यासाठी प्रार्थना करत होतो, असे सॅमसनने सांगितले.
Web Title: IPL 2021: Seeing Chris Morris' storming Batting, Sanju Samson says, Still, I wouldn't have run that single
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.