IPL 2021: दिल्ली कॕपिटल्सच्या यशाला 'शॉर्ट रन'चा मोठा हातभार

दिल्ली कॕपिटल्सने (DC)  सलग तिसऱ्या आयपीएलच्या (IPL)  पहिल्या 'टाय'  (Tie) सामन्यात सुपर ओव्हरमध्ये (Super Over)  यश मिळवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:27 PM2021-04-26T12:27:46+5:302021-04-26T12:28:10+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Short run contributes to Delhi Capitals success | IPL 2021: दिल्ली कॕपिटल्सच्या यशाला 'शॉर्ट रन'चा मोठा हातभार

IPL 2021: दिल्ली कॕपिटल्सच्या यशाला 'शॉर्ट रन'चा मोठा हातभार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

-ललित झांबरे

दिल्ली कॕपिटल्सने (DC)  सलग तिसऱ्या आयपीएलच्या (IPL)  पहिल्या 'टाय'  (Tie) सामन्यात सुपर ओव्हरमध्ये (Super Over)  यश मिळवले. 2019 मध्ये कोलकाता, 2020 मध्ये पंजाब आणि आता हैदराबादवर (SRH)  त्यांनी सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली आहे. पण यातल्या पंजाब (PBKS)  व हैदराबादविरुध्दच्या सामन्यात  केवळ दैवाची साथ लाभली म्हणूनच ते जिंकले असे म्हणता येईल कारण या दोन्ही सामन्यात पराभूत संघ, अनुक्रमे किंग्ज इलेव्हन पंजाब व सनरायझर्स हैदराबादला एक धाव 'शॉर्ट रन' (Short Run)  म्हणून नाकारण्यात आली आणि त्याची त्यांना फार मोठी किंमत चुकवावी लागली. 

IPL 2021: कोरोना संकट गंभीर, आयपीएल पुढे ढकला; पैसा ऑक्सिजन टँकसाठी वापरा, शोएब अख्तरनं दिला सल्ला

रविवारी सनरायझर्स हैदराबादच्या सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरने दोन धावा घेतल्या होत्या पण त्यातील एक 'शॉर्ट' ठरली. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये हैदराबादच्या नावावर आठ धावा लागण्याऐवजी सातच धावा लागल्या आणि सर्वांनी पाहिलेच की विजयासाठी आठ धावांचेच लक्ष्य गाठयलासुध्दा पंत व धवनला शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजावे लागले.अखेरच्या दोन चेंडूंवर तर त्यांना चेंडू बॕटीने खेळतासुध्दा आला नाही. नशिब की प्रत्येकवेळी लेगबायची धाव मिळाली म्हणून दिल्लीने सामना जिंकला म्हणून आता ही चर्चा सुरु आहे की डेव्हिड वॉर्नरचा तो 'शॉर्ट रन' नसता तर.... तर कदाचित दिल्ली हा सामना जिंकू शकले नसते किंवा पहिले सुपर ओव्हरसुध्दा 'टाय' ठरले असते आणि दुसऱ्या  सुपर ओव्हरमध्ये काहीही होवू शकले असते. 

गेल्या वर्षीसुध्दा असाच 'शॉर्ट रन'ने किंग्ज इलेव्हन पंजाबचा घात केला होता आणि सामना टाय होऊन केवळ सुदैवाने दिल्लीला सुपर ओव्हरमध्ये विजय मिळाला होता. 

ऑस्ट्रेलियाच्या दोन क्रिकेटपटूंची IPLमधून माघार, भारतात वाढत्या कोरोनामुळे घेतला निर्णय?; RCBला धक्का

क्रिकेटप्रेमींना आठवतच असेल की त्या सामन्याच्या नियमीत खेळात  तिसरे पंच नितीन मेनन यांनी ख्रिस जॉर्डनने क्रीझच्या आत बॅट टेकवली नसल्याचे कारण देत पंजाबची एक धाव अवैध ठरवली होती. मात्र टेलिव्हिजन रिप्लेंमध्ये ती धाव वैध होती हे स्पष्ट दिसले. ही धाव पंजाबला मिळाली असती तर तो  सामना मुळात 'टाय' राहिलाच नसता आणि सुपर ओव्हरची वेळच न येता पंजाबचा संघ जिंकला असता  पण दुर्देवाने ती धाव पंजाबला नाकारली गेली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यावर कसिगो रबाडाने दिल्लीसाठी विजय खेचून आणला होता. याप्रकारे लागोपाठ दुसऱ्या आयपीएलमध्ये दिल्ली कॕपिटल्सच्या यशाला 'शॉर्ट रन' ने मोठा हातभार लावला आहे. 
 

Web Title: IPL 2021 Short run contributes to Delhi Capitals success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.