इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्याच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी रिषभ पंतच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. रिषभनं आतापर्यंच्या दोन सामन्यांत एक विजय मिळवला आहे, तर गुरुवारी राजस्थान रॉयल्सनं त्यांना पराभूत केले. पण, सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रेयस अय्यर संघाच्या संपर्कात आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यानंतर श्रेयस अय्यरनं DCचा सलामीवीर शिखर धवन याची फिरकी घेतली. महेंद्रसिंग धोनीच्या डोक्यावर एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार, पंजाबविरुद्ध चुकल्यास माफी नाही मिळणार!
त्यानं इंस्टास्टोरीवर एक फोटो पोस्ट केला. त्यात सुजलेल्या मांड्या दिसत आहेत आणि त्याखाली लिहिलं की आजच्या सामन्यानंतर शिखर धवनची अशी अवस्था झाली असेल. या सामन्यात धवनला फलंदाजीत फार कमाल दाखवता आली नाही. त्यानं ११ चेंडूंत ९ धावा केल्या. पण, क्षेत्ररक्षणात त्यानं RRच्या तीन फलंदाजांचे झेल टिपले आणि त्यानंतर मांडीवर हात आपटून नेहमीच्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशनही केलं.Big Blow : राजस्थान रॉयल्सनं विजय मिळवला, परंतु अष्टपैलू खेळाडू १२ आठवड्यांसाठी Out of Action झाला!
त्यावरूनच श्रेयसनं ही पोस्ट लिहिली. राजस्थान रॉयल्सनं १४७ धावांचे लक्ष्य तीन विकेट्स राखून पार केलं. जयदेव उनाडकटनं तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. रिषभ पंतनं सर्वाधिक ५१ धावा केल्या. पण, RRच्या डेव्हिड मिलर ( ५२) व ख्रिस मॉरिस ( ३६*) यांनी दमदार खेळ करताना विजय मिळवून दिला.