IPL 2021, MI vs KKR: अबूधाबीत कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सलामीवीर शुबमन गिलनं मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर लगावलेला खणखणीत षटकार सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. मुंबई इंडियन्सनं दिलेल्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाइट रायडर्सच्या दोन युवा सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या अष्टपैलू खेळाडूनं घेतला 'बायो-बबल' सोडण्याचा निर्णय, मायदेशी रवाना होणार
मुंबई इंडियन्सच्या पहिल्या षटकात शुबमन गिलनं बोल्टच्या वेगवान गोलंदाजीवर निर्भीडपणे फ्रंट फूटवर येत डीप मिड विकेटच्या दिशेनं उत्तुंग षटकार लगावला. गिलनं लगावलेला षटकार इतका थेट अबूधाबी स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडला. शुबमननं तब्बल ९७ मीटरचा षटकार ठोकत केकेआरच्या डावाची जोशात सुरुवात करुन दिली आहे.
'ऋषभ पंतला भारतीय संघातून बाहेर काढायचं असेल तर...', रिकी पाँटिंगनं केली मोठी भविष्यवाणी
शुबमन गिलनं आजच्या सामन्यात ९ चेंडूत १३ धावा केल्या. यात एका षटकार आणि एक चौकाराचा समावेश आहे. गिल मैदानात जम बसवू पाहात असतानाच मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह यानं सामन्याच्या तिसऱ्या षटकात गिलला क्लीनबोल्ड केलं आणि संघाला यश प्राप्त करुन दिलं. शुबमननं सामन्यात केवळ १३ धावा केल्या असल्या तरी त्यानं लगावलेल्या खणखणीत षटकाराची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.