>> ललित झांबरे
आयपीएलमध्ये (IPL) आतापर्यंत शेकडो खेळाडू खेळले आहेत. त्यात देशी आहेत, विदेशी आहेत; अनुभवी आहेत, नवखे आहेत; आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत तसे एकसुद्धा प्रथम श्रेणी सामना न खेळलेलेसुद्धा आहेत पण या सर्वांमध्ये टीम डेव्हिड (Tim David) हा अतिशय वेगळा ठरलाय. हे वेगळेपण त्याच्या कामगिरीने नाही किंवा त्याच्या यशाने नाही तर तो जेथून आलाय त्याच्यामुळे आहे.
जे महेंद्रसिंग धोनीच्या संघाला जमलं, ते विराट कोहलीचा संघ करू शकला नाही; RCBच्या कॅप्टनची कबुली
विराट कोहलीच्या खिलाडूवृत्तीवर ऋतुराज गायकवाडनं उपस्थित केली शंका?, चढला कॅप्टनचा पारा, Video
टीम डेव्हिड हा सिंगापूरचा (Singapore) आहे आणि शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्सने (RCB) त्याला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पदार्पणाची संधी दिली. त्याने जगभरातील टी-20 स्पर्धा खेळत काही सामने गाजविले असले, तरी चेन्नईविरुद्ध तो फक्त एक धाव काढून बाद झाला. मात्र तरीसुध्दा तो वेगळा ठरला. याचे कारण तो ज्या देशातून आलाय, त्या सिंगापूरच्या संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी अद्याप अधिकृत वन डे किंवा कसोटी संघाचा दर्जा मिळालेला नाही आणि अशा देशाचा आयपीएलमध्ये खेळणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. अर्थात, सिंगापूरने टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि टीम डेव्हिडही आंतरराष्ट्रीय टी-20 खेळलाय, पण तो आणि त्याचा देश अद्याप वन डे किंवा कसोटी सामना खेळलेला नाही आणि म्हणूनच टीम डेव्हिड इतरांपेक्षा वेगळा ठरला आहे. एवढेच नाही तर, आयपीएल खेळणारा तो सिंगापूरचा पहिलाच खेळाडू आहे. आरसीबीने त्याला आपल्या संघात फिन अॅलनच्या जागी स्थान दिले आहे.
जवळपास साडेसहा फूट उंचीचा हा अष्टपैलू खेळाडू जन्माने सिंगापूरचे तरी तो सेटल झाला आहे ऑस्ट्रेलियात. सिंगापूरसाठी त्याने 14 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. याशिवाय बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग, रॉयल लंडन कप, कॅरेबियन प्रीमियर लीग अशा स्पर्धा खेळल्या आहेत. रॉयल लंडन कपमध्ये त्याने सरे संघासाठी दोन शतकी खेळीसुद्धा केलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियात सेटल झालेल्या डेव्हिडचे आई वडील सिंगापूरहून तिकडे शिफ्ट झालेले आहेत आणि त्याचे बालपण पर्थ येथे गेले.