IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Live Updates : चेन्नई सुपर किंग्स ( CSK) च्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाला माफक धावसंख्येवर रोखले. वृद्धीमान सहानं चांगला खेळ केला, परंतु CSKच्या गोलंदाजांसमोर अन्य फलंदाजांचे काहीच चालले नाही. या सामन्यात शार्दूल ठाकूरकडून अनावधानानं झालेली चूक महागात पडली असती, परंतु CSKच्या गोलंदाजांनी त्याला सावरून घेतलं.
चेन्नई सुपर किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सॅम कुरनच्या जागी आज ड्वेन ब्राव्हो याचे CSKच्या ताफ्यात कमबॅक झाले. SRHच्या ताफ्यात डेव्हिड वॉर्नरच्या जागी स्थान मिळालेल्या जेसन रॉयनं पहिल्याच सामन्यात धडाकेबाज खेळी केली. पण, आज CSKविरुद्ध तो अपयशी ठरला. जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर रॉय ( २) महेंद्रसिंग धोनीच्या हाती झेलबाद झाला.
SRHचा कर्णधार केन विलियम्सन व वृद्धीमान सहा यांनी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु ब्राव्होनं त्याच्या पहिल्याच षटकात विलियम्सनला ( ११) पायचीत पकडले. हैदराबादला ४२ धावांत २ धक्के बसले. ९व्या षटकात सहानं टोलावलेला चेंडू CSKच्या खेळाडूनं टिपला अन् एकच जल्लोष सुरू झाला. पण, शार्दूल ठाकूरनं टाकलेला तो चेंडू नो बॉल असल्याचा निर्णय तिसऱ्या अम्पायरनं दिला. ( Shardul Thakur removes Wriddhiman Saha, but he has overstepped! )