IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Live Updates : २०२० च्या आयपीएलमध्ये सर्वात आधी गाशा गुंडाळावा लागलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) जबरदस्त कमबॅक करताना आयपीएल २०२१त प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या संघाचा मान पटकावला. सनरायझर्स हैदराबाद ( SRH) विरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) खणखणीत षटकारानं CSKच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. २०११च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीचा असा षटकार पाहायला मिळाला होता आणि आज ३ चेंडूंत २ धावांची गरज असताना सिद्धार्थ कौलनं टाकलेला चेंडू धोनीनं स्टेडियमबाहेर भिरकावला अन् साक्षी धोनीसह सर्वांनी एकच जल्लोष केला..
चेन्नई सुपर किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वृद्धीमान सहा ( ४४) वगळला तर हैदराबादचे फलंदाज अपयशी ठरले. मॅन ऑफ दी मॅच ठरलेल्या जोश हेझलवूडनं २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. ड्वेन ब्रोव्होनं १७ धावांत २, तर रवींद्र जडेजा व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हैदराबादला ७ बाद १३४ धावांवर समाधान मानावे लागले.
माफक लक्ष्याच्या प्रत्युत्तरात CSKच्या फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड यांनी पॉवरफुल्ल खेळ केला. ऋतुराजनं ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ४५ धावा केल्या. फॅफ ड्यू प्लेसिसनं ४१ धावा केल्या. मोईन अली फटाफट १७ धावा करून राशिद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. जेसन होल्डरनं २७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. धोनीनं नाबाद १४, तर अंबाती रायुडूनं नाबाद १७ धावा केल्या. चेन्नईनं हा सामना ६ विकेट्स राखून जिंकला.
Web Title: IPL 2021, SRH vs CSK Live Updates : A six from MS Dhoni to finish the game, we are seen this for almost two decades, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.