IPL 2021, SRH vs CSK : घासून नाही ठासून येणार; महेंद्रसिंग धोनीनं मागच्या वर्षी दिलेलं वचन पूर्ण केलं, बघा काय म्हणाला तो

चेन्नई सुपर किंग्स ( CSK)नं आयपीएल २०२१च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 12:23 AM2021-10-01T00:23:31+5:302021-10-01T00:27:08+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, SRH vs CSK :  MS Dhoni, "Last year, we said we wanted to come back stronger, that is what we known for, this means lot for qualifying into the play-offs" | IPL 2021, SRH vs CSK : घासून नाही ठासून येणार; महेंद्रसिंग धोनीनं मागच्या वर्षी दिलेलं वचन पूर्ण केलं, बघा काय म्हणाला तो

IPL 2021, SRH vs CSK : घासून नाही ठासून येणार; महेंद्रसिंग धोनीनं मागच्या वर्षी दिलेलं वचन पूर्ण केलं, बघा काय म्हणाला तो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Live Updates : २०२० च्या आयपीएलमध्ये सर्वात आधी गाशा गुंडाळावा लागलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) जबरदस्त कमबॅक करताना आयपीएल २०२१त प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या संघाचा मान पटकावला. चेन्नई सुपर किंग्स ( CSK)नं आयपीएल २०२१च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला. CSKच्या खात्यात ११ सामन्यांत १८ गुण जमा झाले आहेत. आता उर्वरित जागांसाठी दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आघाडीवर आहेत. या सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) खूप मोठं विधान केलं होतं.

 
चेन्नई सुपर किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वृद्धीमान सहा ( ४४) वगळला तर हैदराबादचे फलंदाज अपयशी ठरले. मॅन ऑफ दी मॅच ठरलेल्या जोश हेझलवूडनं २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. ड्वेन ब्रोव्होनं १७ धावांत २, तर रवींद्र जडेजा व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हैदराबादला ७ बाद १३४ धावांवर समाधान मानावे लागले.

माफक लक्ष्याच्या प्रत्युत्तरात CSKच्या फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड यांनी पॉवरफुल्ल खेळ केला.  ऋतुराजनं ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ४५ धावा केल्या. फॅफ ड्यू प्लेसिसनं ४१ धावा केल्या. मोईन अली फटाफट १७ धावा करून राशिद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. जेसन होल्डरनं २७ धावांत ३  विकेट्स घेतल्या. धोनीनं नाबाद १४, तर अंबाती रायुडूनं नाबाद १७ धावा केल्या. चेन्नईनं हा सामना ६ विकेट्स राखून जिंकला. 
 


महेंद्रसिंग धोनी काय म्हणाला?
प्ले ऑफमधील स्थान माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मागील वर्षी सामन्यानंतर मी म्हणालो होतो की आम्हाला जबरदस्त कमबॅक करायचा आहे. तुम्ही चुकांतूनच शिकता आणि या वर्षी आम्ही पहिल्या सत्रात चांगली कामगिरी केली. याचे संपूर्ण श्रेय खेळाडू व सपोर्ट स्टाफला जाते. या खेळपट्टीवर चेंडू फिरकी घेण्यास मदत मिळत नव्हती, परंतु तो चांगला उसळी घेत होता. याची कल्पना गोलंदाजांना सामना सुरू होण्यापूर्वी दिली होती आणि त्यांनी चांगली कामगिरी केली. चाहत्यांनीही आम्हाला चांगला पाठींबा दिला आणि मी CSKच्या वतीनं सांगतो की चाहत्यांचा मला अभिमान आहे.'' 


Web Title: IPL 2021, SRH vs CSK :  MS Dhoni, "Last year, we said we wanted to come back stronger, that is what we known for, this means lot for qualifying into the play-offs"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.