ipl 2021 t20 SRH vs RCB live match score updates chennai : संथ खेळपट्टीवर सनरायझर्स हैदराबादच्या ( Sunrisers Hyderabad) गोलंदाजांनी रॉयल चॅलेंजर बंगलोर ( Royal Challengers Bangalore) च्या तगड्या फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करायला लावला. विराट कोहली व ग्लेन मॅक्सवेल बराच वेळ खेळपट्टीवर होते, पंरतु त्यांनाही मोठी खेळी करता आली नाही. विराट पहिल्या सामन्यात ३३ धावांवर गेला होता आणि आजही त्याच धावेवर त्याची खेळी संपुष्टात आली. पण, डगआऊटमध्ये जाताच विराटनं त्याचा राग काढला. IPL 2021 : SRH vs RCB T20 Live Score Update
कोरोनावर मात करून प्रथमच मैदानावर उतरलेल्या देवदत्त पडीक्कलवर सर्वांचे लक्ष होते. त्यानं दोन चौकार मारून सर्वांच्या अपेक्षा उंचवल्या, परंतु भुवनेश्वर कुमारनं त्याला मोठी खेळी करू दिली नाही. देवदत्त ११ धावांवर शाहबाज नदीमकरवी झेलबाद होऊन माघारी परतला. कर्णधार विराटनं तिसऱ्या क्रमांकावर शाहबाज अहमद याला पाठवणार असल्याचे आधीच स्पष्ट केलं होतं. त्यानंही आत्मविश्वासानं खेळ करताना विराटला उत्तम साथ दिली. शाहबाद नदीमच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् राशिद खाननं सुरेख झेल टिपला. अहमद १४ धावांवर बाद झाला. नदीमनं टाकलेल्या या सातव्या षटकात एक धाव देत एक विकेट घेतली. IPL 2021 SRH vs RCB Live T20 Score
शाहबाज नदीमच्या फिरकीवर फटके मारताना ग्लेन मॅक्सवेल चाचपडताना दिसला. त्यानं टाकलेल्या ९ चेंडूंत मॅक्सवेलला २ धावाच घेता आल्या. RCBला पहिल्या दहा षटकांत २ बाद ६३ धावा करता आल्या. ११व्या षटकात मॅक्सवेलनं गिअर बदलला अन् नदीमनं टाकलेल्या पहिल्या चार चेंडूंत १७ ( २ षटकार व १ चौकार) धावा कुटून काढल्या. नदीमनं ४ षटकांत ३६ धावांत १ विकेट घेतली. यातील चौथ्या षटकात २२ धावा आल्या. RCBची गाडी आता सुसाट धावेल असे वाटत असताना १३व्या षटकात जेसन होल्डरनं पहिल्याच षटकात विराटला ( ३३) माघारी पाठवले. विराट-ग्लेननं ३८ धावांत ४४ धावांची भागीदारी केली. होल्डरनं त्या षटकात १ धाव देत विकेट घेतली. SRH vs RCB, SRH vs RCB live score, IPL 2021, IPL 2021 latest news
पाहा विराट कसा बाद झाला... डगआऊटमध्ये जाताच विराटनं खुर्चीवर जोरात बॅट आपटली. त्यानं त्याचा राग व्यक्त केला.