IPL 2021, SRH vs RCB T20 : KKRच्या चुकांचा पाढा आज सनरायझर्स हैदाराबादनं गिरवला, RCBला हातचा सामना दिला

IPL 2021 SRH vs RCB Match Highlightsचेपॉकच्या खेळपट्टीचा अंदाज बांधणे जरा अवघडच होऊन बसलं आहे. मंगळवारी मुंबई इंडियन्स ( MI) ज्या स्थितीत होतं तिच परिस्थिती आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) च्या ताफ्यात दिसत होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 11:36 PM2021-04-14T23:36:46+5:302021-04-14T23:40:00+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 SRH vs RCB Match Highlights: RCB wins the game in last three overs, know reason behind SRH loss | IPL 2021, SRH vs RCB T20 : KKRच्या चुकांचा पाढा आज सनरायझर्स हैदाराबादनं गिरवला, RCBला हातचा सामना दिला

IPL 2021, SRH vs RCB T20 : KKRच्या चुकांचा पाढा आज सनरायझर्स हैदाराबादनं गिरवला, RCBला हातचा सामना दिला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021  t20 SRH vs RCB live match score updates chennai : चेपॉकच्या खेळपट्टीचा अंदाज बांधणे जरा अवघडच होऊन बसलं आहे. मंगळवारी मुंबई इंडियन्स ( MI) ज्या स्थितीत होतं तिच परिस्थिती आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) च्या ताफ्यात दिसत होती. पण, टीम इंडियाचे अनुभवी फलंदाज नेतृत्व करत असलेल्या या दोन्ही संघांनी गमावलेला सामना खेचून आणण्यात यश मिळवलं. कोलकाता नाईट रायडर्सनं ( KKR) काल केलेल्या चुका आज सनरायझर्स हैदराबादकडून ( SRH) झाल्या आणि त्यांना अती घाई नडली... १७ पे खतरा!; शाहबाज अहमदनं RCBला गमावलेला सामना जिंकून दिला, SRHने ४७ धावांत गमावले ८ फलंदाज

IPL 2021 SRH vs RCB Match Highlights

  • सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी कर्णधार डेव्हिड वॉर्नरला तक्रारीची कोणतीच संधी दिली नाही. भुवनेश्वर कुमार, जेसन होल्डर व राशिद खान या अनुभवी गोलंदाजांनी RCBच्या धावांना वेसण घातले. ग्लेन मॅक्सवेल वगळता RCBच्या अन्य फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहली ३३ धावांवर माघारी परतला.
  • झटपट विकेट गेल्यानंतर विराट व मॅक्सवेल यांनी RCBचा डाव सावरला, परंतु त्यांचा धावांचा वेग फार कमी होता. या दोघांनी ३८ चेंडूंत ४४ धावांची भागीदारी केली. SRHच्या गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. मॅक्सवेल ५९ धावांवर माघारी परतला. एबी डिव्हिलियर्स अपयशी ठरला. त्यामुळे RCBला ८ बाद १४९ धावांवर समाधान मानावे लागले.
  • तिसऱ्या षटकात विकेट मिळवूनही रॉयल चॅलेंजरस् बंगलोर संघाला सामन्यावर पकड घेता आली नाही. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी दमदार खेळ करताना RCBच्या हातून सामना खेचला होता. वृद्धीमान सहाला ( १) पुन्हा एकदा अपयश आलं
  • अर्धशतक करून वॉर्नर माघारी परतल्यानंतर मनीष पांडेच्या खांद्यावर जबाबदारी होती. वॉर्नरनं ३७ चेंडूंत ७ चौकार व १ षटकासह ५४ धावा केल्या. मनीष पांडेसह त्यानं ६९ चेंडूंत ८३ धावा जोडल्या. वॉर्नर बाद झाला तेव्हा ४० चेंडूंत ५४ धावांची गरज होती. त्यामुळे सावध खेळ करूनही SRHला हा सामना जिंकता आला असता. 
  • विराट कोहलीचा हुकूमी एक्का असलेल्या युझवेंद्र चहलचे अपयश RCBची डोकेदुखी ठरत आहे. आजच्या सामन्यातही तो विकेट घेण्यात अपयशी ठरला. चहलनं ४ षटकांत २९ धावा दिल्या. 
  • अखेरच्या २४ चेंडूंत ३५ धावांची गरज असताना विराटनं फिरकीपटू शाहबाज अहमदच्या हाती चेंडू सोपवला अन् तिथेच सामना फिरला. १७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शाहबाज अहमदनं SRHच्या जॉनी बेअरस्टोला ( १२) बाद केले. पुढच्याच चेंडूवर SRHचा सेट फलंदाज मनीष पांडेही ( ३८) बाद झाला. 
  • या दोन विकेटनं RCBच्या ताफ्यात चैतन्य निर्माण केलं. याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अहमदनं SRHला तिसरा धक्का देताना अब्दुल समदला शून्यावर माघारी पाठवले. त्यानंतर हैदराबादला कमबॅक करता आले नाही. त्यांना २० षटकांत ९ बाद १४३ धावांवर समाधान मानावे लागले. 
  • अखेरच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज असताना हर्षल पटेलनं तिसरा चेंडू नो बॉल फेकला अन् त्यावर राशिद खाननं चौकार मारला. त्यानंतर फ्री हिटवर धाव घेण्यात अपयशी ठरला. त्यात राशिदनं एक शॉर्ट धाव घेतली. त्यामुळे हैदराबादला १ चेंडूंत ८ धावांची गरज होती. हर्षल पटेलनं अखेरचं षटक उत्तम फेकलं.
  • शाहबाजनं २ षटकांत ७ धावात ३ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेल व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. १ बाद ९६ वरून हैदराबाद संघाची अवस्था ९ बाद १४३ अशी झाली. 

Web Title: IPL 2021 SRH vs RCB Match Highlights: RCB wins the game in last three overs, know reason behind SRH loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.