IPL 2021 : सनरायजर्स हैदराबादमध्ये पुनरागमन करण्याची क्षमता, वॉर्नरला आक्रमक खेळताना बघणे सुखावणारे

IPL 2021 : मंगळवारी मुंबई इंडियन्सने केकेआरचा पराभव केला तर बुधवारी ३५ षटके वर्चस्व गाजवणाऱ्या सनरायजर्स संघाला रॉयल चॅलेंजर्सचे आव्हान मोडून काढता आले नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 07:11 AM2021-04-16T07:11:11+5:302021-04-16T07:11:40+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Sunrisers Hyderabad's ability to make a comeback, pleasing to watch Warner play aggressively | IPL 2021 : सनरायजर्स हैदराबादमध्ये पुनरागमन करण्याची क्षमता, वॉर्नरला आक्रमक खेळताना बघणे सुखावणारे

IPL 2021 : सनरायजर्स हैदराबादमध्ये पुनरागमन करण्याची क्षमता, वॉर्नरला आक्रमक खेळताना बघणे सुखावणारे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- व्हीव्हीएस लक्ष्मण...यांच्या लेखणीतून


सलामी लढतीत मुंबई इंडियन्सने आक्रमक खेळीला प्रोत्साहन दिले आहे, पण चेन्नईमध्ये अखरेच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याची रणनीती धोकादायक ठरली. मंगळवारी मुंबई इंडियन्सने केकेआरचा पराभव केला तर बुधवारी ३५ षटके वर्चस्व गाजवणाऱ्या सनरायजर्स संघाला रॉयल चॅलेंजर्सचे आव्हान मोडून काढता आले नाही.

केवळ सहा सामने झालेल्या यंदाच्या आयपीएलच्या पर्वात रंगतदार लढती अनुभवाला मिळाल्या. राजस्थान रॉयल्स संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला असला तरी संजू सॅमसनची खेळी संस्मरणीय होती. त्यामुळे वानखेची खेळपट्टी चर्चेत राहिली तर चेन्नईमध्ये कोलकाता नाईट रायडर्स व सनराजयर्स हैदराबाद यांनी विजयाची संधी असताना गमावली.
कर्णधार म्हणून सॅमसनची पहिली खेळी वर्चस्व गाजवणारी होती. सध्याच्या घडीला तो आयपीएलमधील सुपरस्टार आहे, पण त्याची ही शतकी खेळी दीर्घकाळ त्याचे मनोधैर्य उंचावणारी ठरेल आणि राष्ट्रीय संघात स्थान पक्के करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. संघाला विजय मिळवून देण्यात त्याचे प्रयत्न अपुरे पडले असले तरी त्याच्या खेळात आत्मविश्वास झळकता होता.
त्याआधी, पंजाब किंग्सतर्फे फलंदाजीमध्ये बढती मिळालेल्या दीपक हुडाने शानदार खेळी केली. बडोदा संघाने शिस्तभंगासाठी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर गेले काही महिने त्याच्यासाठी क्लेशदायक होते. या कालावधीत कसून मेहनत घेत मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील होतो, असेच त्याला सांगायचे असावे. या व्यासपीठावर आपल्या कामगिरीने उत्तर देणे योग्य आहे. डेव्हिड वॉर्नरला आक्रमक खेळताना बघणे सुखावणारे होते. तो आणि मनीष पांडे खेळपट्टीवर असताना लक्ष्याचा पाठलाग करण्यात हैदराबाद संघ यशस्वी होईल, असे वाटत होते. वॉर्नर बाद झाल्यानंतर मात्र संघाची घसरगुंडी उडाली. त्यात शाहबाज अहमदच्या एकाच षटकात तीन बळी गमावल्यामुळे संघ दडपणाखाली आला. मनीष ज्या पद्धतीने बाद झाला त्यावरून तो स्वत:वर निराश झाला असेल. अनुभवी मनीषला सेट झालेल्या फलंदाजाचे महत्त्व कळत असेल. नवा फलंदाज खेळपट्टीवर आल्यानंतर त्याला स्थिरावण्याची संधी मिळत नाही. मनीष चांगला फलंदाजी करीत होता. उर्वरित संघातील खेळाडूंप्रमाणे तो सुद्धा पहिल्या दोन लढतींमध्ये केलेल्या चुकांपासून बोध घेईल, अशी आशा आहे. आम्ही दमदार पुनरागमन करू शकतो, असा आम्हाला विश्वास आहे. (गेमप्लॅन)

Web Title: IPL 2021: Sunrisers Hyderabad's ability to make a comeback, pleasing to watch Warner play aggressively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.